Numerology Secrets : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिषशास्त्राचा एक अविभाज्य घटक आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रात व्यक्तीच्या राशीवरून त्याचे भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ सांगितले जाऊ शकते. तर दुसरीकडे अंकशास्त्रात व्यक्तीच्या जन्मतारखेवरून देखील त्याचा भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळाबाबत अचूक माहिती सांगता येणे शक्य आहे.
अंकशास्त्र असे सांगते की व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून मुलांक काढला जातो आणि हाच मुलांक व्यक्तीचा स्वभाव, त्याचे व्यक्तिमत्त्व तसेच त्याच्या आयुष्यातील इतर अनेक गोष्टींचा उलगडा करत असतो.

मुलांक हा 1 ते 9 दरम्यान असतो. पण आज आपण अशा एका मुलांकाची माहिती पाहणार आहोत ज्या मुलांकाच्या मुलींना सर्वाधिक भाग्यवान समजले जाते.
मुलांक कसा निघतो
अंकशास्त्रानुसार मुलांक हा 1 ते 9 दरम्यान असतो. व्यक्तीच्या केवळ जन्म तारखेच्या बेरजेवरून मुलांक निघतो. समजा कोणत्याही महिन्याच्या 21 तारखेला एखाद्या व्यक्तीचा जन्म झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक 2+1=3 राहणार आहे.
जर समजा कोणत्याही महिन्याच्या 31 तारखेला एखाद्या व्यक्तीचा जन्म झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुलांक 3+1=4 राहणार आहे. एक तारखेला जन्म झालेला असेल तर मुलांक 1 राहणार आहे.
या मुलांकाच्या मुली असतात भाग्यवान
आज आपण 7 मुलांक असणाऱ्या मुलींच्या स्वभावा बाबत माहिती पाहणार आहोत. या मुलांका बाबत अंकशास्त्रात नेमके काय म्हटले गेले आहे याबाबतची डिटेल माहिती आज आपण या लेखातून जाणून घेऊयात.
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या म्हणजेच जानेवारी ते डिसेंबर यातील कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला झालेला असेल त्या लोकांचा मुलांक 7 राहणार आहे. या मुलांकाच्या मुलींना समाजात फारच मान मिळतो.
समाजात तसेच कुटुंबात देखील या मुलींना फारच मान सन्मान आणि आदर दिला जातो. या मुली प्रचंड भाग्यवान समजल्या जातात. मात्र या मुली आपल्या स्वभावामुळे अनेकदा आपले प्रेम सुद्धा गमावतात.
घरात, कुटुंबात किंवा समाजात जेव्हा लग्नाचा विषय निघतो तेव्हा त्या मुली तेथून लगेचच पळ काढतात. मात्र या मुलींचे वैवाहिक जीवन फारच सुखकर असते. या इतक्या भाग्यवान असतात की लग्नानंतर या मुलींमुळे त्यांच्या पतीचे भाग्य सुद्धा चमकते.