‘या’ तारखेला जन्मलेल्या मुली नवऱ्यासाठी ठरतात लकी ! अंकशास्त्रानुसार सर्वात भाग्यवान मुली कोण ?

अंकशास्त्रात असा एक मुलांक सांगितला गेला आहे ज्या मुलांकाच्या मुली या फारच भाग्यवान समजल्या जातात. असे मानले जाते की, ज्या मुलींचा मूलांक क्रमांक 2 असतो त्या मुली लग्नानंतर आपल्या नवऱ्यासाठी खूपचं भाग्यवान असतात. कोणत्याही महिन्याच्या 2, 11 किंवा 20 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा दोन असतो.

Tejas B Shelar
Published:
Numerology Secrets

Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचा एक भाग आहे. अंकशास्त्रानुसार, फक्त व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचे भविष्य सांगितले जाऊ शकते. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक काढला जातो अन यावरून व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व अधोरेखित होते. हाच मुळांक व्यक्तीचे भविष्य देखील सांगतो.

अंकशास्त्रात असा एक मुलांक सांगितला गेला आहे ज्या मुलांकाच्या मुली या फारच भाग्यवान समजल्या जातात. असे मानले जाते की, ज्या मुलींचा मूलांक क्रमांक 2 असतो त्या मुली लग्नानंतर आपल्या नवऱ्यासाठी खूपचं भाग्यवान असतात. कोणत्याही महिन्याच्या 2, 11 किंवा 20 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुलांक हा दोन असतो.

मुळांक हा व्यक्तीच्या जन्मतारखेच्या बेरजेवरून निघतो. म्हणजे ज्या लोकांची जन्मतारीख 11 आहे त्या लोकांचा मुलांक 1+1=2 असतो. आता आपण मुलांक 2 असणाऱ्या लोकांचा विशेषता मुलींचा स्वभाव अन व्यक्तीमत्व कसे असते? याबाबत माहिती पाहुयात.

कसा असतो स्वभाव?

या मूलांकांच्या लोकांवर चंद्राचा प्रभाव असतो. हे लोक त्यांच्या जीवनातील अनेक पैलूंवर, विशेषत: त्यांचे नातेसंबंध आणि वैवाहिक जीवन प्रभावित करते. त्यांना एक आदर्श जीवन साथीदार मानले जाते, कारण ते त्यांच्या कुटुंबासाठी आणि जोडीदारासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात.

या मुली खूपचं भावनिक आणि हुशार असतात. हे लोक आपल्या बुद्धीच्या जोरावर आयुष्यात खूप यशस्वी होतात. त्यांना त्यांच्या नात्यात खोल भावना जाणवतात आणि ते नेहमी त्यांच्या जोडीदाराची काळजी घेतात. त्यांच्यासाठी, कुटुंबाचा आनंद सर्वात महत्वाचा असतो.

या मुलांकाच्या मुलींची भावना आणि त्यांचा काळजी घेणारा स्वभाव त्यांना एक उत्तम पत्नी आणि सून बनवतो यामुळे या मुली आपल्या नवऱ्यासाठी लकी ठरतात.

या मुली फारच सकारात्मक असतात अन या मुलींच्या आजूबाजूला असणारे लोक सकारात्मक ऊर्जेमुळे त्यांच्याकडे आकर्षित होतात. या मुली कोणासोबतही चांगल्याचं वागतात या मुलींच्या मनात कोणाच्याही विरोधात वाईट भावना नसते.

यामुळे या मुली आदर्श पत्नी बनतात आणि लग्नानंतर आपल्या पतीसाठी आणि सासरच्या व्यक्तींसाठी भाग्यशाली ठरतात. या मुलींसोबत जो कोणी लग्न करतो त्याची परिस्थिती लग्नानंतर बदलते असे म्हणतात.

या मुली नेहमीच इतरांसाठी धावून जातात त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतात. गरजू लोकांना मदत करण्यात या मुली आघाडीवर असतात. या मुलींच्या अंगी असणारे हेच गुण त्यांना एक आदर्श पत्नी आणि आदर्श सून बनवतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe