कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोक कोणासमोरचं झुकत नाहीत ! या लोकांचा स्वभाव कसा असतो ?

Numerology Secrets : अंकशास्त्र हा वैदिक ज्योतिष शास्त्राचा एक महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. ज्योतिष शास्त्रात 12 राशी जशा महत्वपूर्ण असतात त्याप्रमाणे अंकशास्त्रात 1 ते 9 अंक महत्त्वाचे मानले जातात.

अंकशास्त्रात मूळांक, भाग्यांक नामांक असे काही प्रकार असतात ज्यावरून व्यक्तीचा भूतकाळ भविष्यकाळ तसेच वर्तमान काळाबाबत माहिती सांगितली जाते. यातील मूळांक हा व्यक्तीच्या स्वभावाची माहिती देतो.

मुळांकावरून व्यक्तीचा स्वभाव कसा असतो, असे व्यक्ती कोणत्या क्षेत्रात चांगले काम करू शकतात अशा एक ना अनेक गोष्टी उलगडता येतात आणि आज आपण अशाच एका महत्त्वाच्या मुळांकाची माहिती पाहणार आहोत. आज आपण मुळांक 1 ची माहिती पाहणार आहोत. पण त्याआधी आपण मूळांक कसा काढायचा याविषयी माहिती पाहूयात.

तुमचा मुलांक असा काढा

व्यक्तीचा मुळांक हा जन्म तारखे वरून निघतो. जन्मतारखेची बेरीज केल्यानंतर जो अंक येतो तो अंक त्या व्यक्तीचा मुळांक असतो आणि मुळांक हा नेहमी एक ते नऊ दरम्यान असतो.

थोडक्यात जर एखाद्या व्यक्तीचा जन्म कोणत्याही महिन्याच्या वीस तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुळांक हा 2+0 = 2 येणार. तीन तारखेला झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुळांक तीनच राहणार.

19 तारखेला जन्म झालेला असेल तर त्या व्यक्तीचा मुळांक 1+9=10=1+0=1 असतो. म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 1,10, 19 आणि 28 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मुळांक हा एक आहे.

मुलांक 1 असणाऱ्या लोकांचा स्वभाव कसा असतो ?

मुलांक एक असणाऱ्या लोकांमध्ये लीडरशिप कॉलिटी असते. हे लोक पॉलिटिक्स मध्ये मोठ्या प्रमाणात सक्रिय दिसतात. प्रशासनात सुद्धा हे लोक मोठ्या प्रमाणात दिसतात. मुलांक एक असणारे लोक लीडरशिप, पॉलिटिक्स आणि प्रशासन या क्षेत्रात आपले करिअर चांगल्या पद्धतीने बिल्ड करू शकतात.

या अंकाचा स्वामी ग्रह सूर्यदेव असल्याने हा अंक शांतीचा प्रतीक आहे. स्वाभिमान आणि मेहनत हे या लोकांचे एक महत्त्वाचे हत्यार आहे. या आपल्या हत्याराच्या जोरावर हे लोक आपल्या आयुष्यात चांगले यश संपादित करतात.

आकर्षक स्वभाव, महत्त्वाकांक्षी आणि आपापल्या कामात साध्य केलेली कुशलता हे गुण या लोकांना इतरांपेक्षा थोडे हटके बनवतात.हे लोक कोणापुढेच वाकत नाहीत, स्वाभिमान या लोकांना विशेष प्रिय असतो.

हे लोक प्रामाणिक असतात आणि आपल्या विचारावर ठाम असतात. हे लोक थोडे हट्टी असतात आणि कधी कधी चुकीच्या ठिकाणी त्यांचा हट्ट दिसतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्यांची क्षमता अनेकदा त्यांच्यासाठी फायद्याची ठरते.

या लोकांना जीवनात मोठा मानसन्मान मिळतो. हे लोक आपले नाते प्रामाणिकपणे, निष्ठेने आणि समर्पणाने निभवण्याची क्षमता ठेवतात. अध्यात्मिक, धार्मिक, तर्कशुद्ध आणि शिस्तप्रिय स्वभावाची ही लोक आपल्या आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात.