Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचाच एक महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. ज्योतिष शास्त्रात राशीवरून व्यक्तीचे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमानकाळ याची माहिती मिळते. त्याचप्रमाणे अंकशास्त्रातुन केवळ व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचे भूत, भविष्य आणि वर्तमानाची माहिती जाणून घेता येते.
व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूळांक काढला जातो आणि हाच मुळांक व्यक्तीची संपूर्ण जन्म कुंडली मांडत असतो. मुळांक हा जन्मतारखेच्या बेरजेवरून काढला जात असतो.
समजा एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख 22 आहे. तर अशा व्यक्तीचा मुळांक 2+2=4 राहणार आहे. म्हणजेच कोणत्याही महिन्याच्या 22 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूळांक 4 राहील. दरम्यान आज आपण ज्या लोकांचा मूळांक 7 असतो त्यांच्या बाबत माहिती पाहणार आहोत.
अंकशास्त्रानुसार ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16 आणि 25 तारखेला झालेला असतो अशा लोकांचा मूळांक हा सात असतो. आता आपण सात मूळांक असणाऱ्या लोकांचा स्वभाव आणि त्यांच्या करिअर बाबत थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कसा असतो स्वभाव अन करिअर
अंकशास्त्र असे सांगते की सात मुळांक असणाऱ्या लोकांचे वर्तन अतिशय सौम्य असते. हे लोक खूपच चांगल्या मनाची असतात. आपल्या कोमल मनाने आणि साध्या व्यक्तिमत्त्वाने हे लोक इतरांची मने जिंकतात. हे लोक रागीट स्वभावाचे सुद्धा असतात.
मात्र सर्वांशी छान बोलत असल्याने यांच्या रागाचाही लोकांवर विपरीत परिणाम होत नाही. हे लोक खूपच गोड बोलतात आणि हिच त्यांची खुबी त्यांना आयुष्यात सक्सेस मिळवून देते. हे लोक अद्भुत बुद्धिमत्तेचे स्वामी असतात. या मूलांकाचे लोक अभ्यासाच्या बाबतीत खूप वेगवान असतात.
शिक्षणात या लोकांना अगदीच लहानपणापासून रस असतो. त्यांना वाचनाची आणि लेखनाची आवड असते. ते अभ्यासापासून कधीच लांब पळत नाहीत. जेव्हा हे लोक अभ्यासाला बसतात तेव्हा ते पूर्ण लक्ष केंद्रीत करतात. अव्वल विद्यार्थ्यांमध्ये यांचा समावेश होतो.
अभ्यासात हुशार असल्यामुळे या लोकांना नोकरी मिळवण्यात कोणतीचं अडचण येत नाही. यांना अगदी सहजच सरकारी नोकरी मिळते. या तारखांना जन्मलेल्या लोकांना सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता अधिक असते.
हे लोक केवळ अभ्यासात हुशार नसतात तर करिअरच्या बाबतीतही त्यांना भरघोस यश मिळते. यांना सरकारी नोकरी मिळाली तर ते खूप मोठ्या पदावर पोहोचतात.