Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिष शास्त्राचाचं एक भाग. अंकशास्त्रावर अनेक जणांचा विश्वास असतो. अंकशास्त्रानुसार केवळ व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ अधोरेखित होत असतो.
अर्थातच व्यक्तीच्या केवळ जन्म तारखे वरून त्याचे भविष्य सांगितले जाऊ शकते. व्यक्तीचा स्वभाव कसाय, त्याच व्यक्तिमत्व कसे आहे याचा अंदाज त्याच्या जन्मतारखेवरून मिळू शकतो. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून मुळांक काढला जातो आणि याच मुळांकावरून व्यक्तीचा स्वभाव आणि त्याचे व्यक्तिमत्व सहजतेने ओळखता येते.

मुळांक हा जन्म तारखेच्या बेरजेवरून निघत असतो. मुळांक हा एक ते नऊ दरम्यान असतो.ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या अकरा तारखेला झालेला असतो त्यांचा मुळांक 1+1 = 2 असतो. तसेच ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या एक तारखेला झालेला असतो त्यांचा मूळ अंक एक असतो. दरम्यान आज आपण मुळांक एक असणाऱ्या लोकांच्या स्वभावाची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
या जन्म तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूळांक 1 असतो
कोणत्याही महिन्याच्या अर्थातच जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांपैकी कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 आणि 28 या तारखांना जन्मलेल्या लोकांचा मूळांक एक असतो.
मुळांक 1 असणाऱ्या लोकांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्व
मुलांक 1 असलेले लोक त्यांच्या करिअरला खूप महत्त्व देतात. त्यांच्यासाठी, काम आणि यश नेहमी प्रथम असते. ते त्यांच्या कामासाठी नातेसंबंध मागे टाकण्यास मागेपुढे पाहत नाहीत.
हे लोक खूपच स्वाभिमानी असतात. त्यांना नेहमीचं स्वावलंबी राहायला आवडते. त्यांना त्यांचा सन्मान आणि आदर खूप महत्त्वाचा असतो. ते आपला सन्मान आणि आदर कोणत्याही किंमतीत गमावू इच्छित नाहीत.
अर्थातच या लोकांना त्यांची इज्जत खूपच प्रिय असते. आपली इज्जत जाणार नाही यासाठी हे लोक नेहमीच स्वावलंबी आयुष्य जगतात. कोणाला फसवणे या लोकांना आवडत नाही. हे लोक लीडर असतात. लीडरशिप कॉलिटीमुळे हे लोक कोणत्याही क्षेत्रात असले तरी देखील नेतृत्वच करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे लोक उत्कृष्ट राजकारणी देखील बनतात.
या लोकांना स्वतःवर खूपच विश्वास असतो आणि याच आत्मविश्वासाच्या जोरावर हे लोक यश प्राप्त करतात. आपले स्वप्न आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी हे लोक खूपच दृढ निश्चयी असतात. दृढ निश्चयाच्या जोरावर कशीही परिस्थिती असली तरी देखील हे यश मिळवतात.
या लोकांना स्वातंत्र्याने जगणे आवडते. त्यांना कशातही बांधून राहणे आवडत नाही. ते कोणत्याही परिस्थितीत त्यांचे विचार व्यक्त करण्यास मागेपुढे पाहत नाहीत आणि त्यांच्या मनात जे आहे ते व्यक्त करतात. ते त्यांच्या उद्दिष्टांप्रती खूप गंभीर असतात आणि त्यांची सर्व कामे एकाग्रतेने करतात. त्यांची एकाग्रता त्यांना जीवनात यशस्वी बनवतेच.