Numerology Secrets : अंकशास्त्र हा ज्योतिषशास्त्राचाच एक महत्त्वाचा भाग आहे. अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या फक्त जन्मतारखेवरून त्याचे भूत, भविष्य आणि वर्तमान याचा अंदाज लावता येतो. अंकशास्त्रात अंकांना विशेष महत्त्व असते. दरम्यान आज आपण अशा लोकांची माहिती पाहणार आहोत जे की जन्मजात भाग्यवान असतात.
हे लोक असतात जन्मता भाग्यवान
अंकशास्त्रात असे नमूद करण्यात आले आहे की व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्याचा मूळांक काढला जातो अन याच आधारावर त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची, स्वभावाची आणि भविष्याची माहिती घेता येऊ शकते. त्याचं करियर कसं असेल? लग्नाबाबत तसेच पैसा पाणी बाबत सर्व माहिती या मुलांकाकडून आपल्याला मिळते.

मुलांक जन्मतारखेच्या बेरजेवरून काढला जातो. मात्र मुलांक हा एक ते नऊ दरम्यानचं असतो. म्हणजेच समजा जर तुम्ही कोणत्याही महिन्याच्या 25 तारखेला जन्मलेला असाल तर तुमचा मुलांक 2+5=7 असेल.
आज आपण याच सात मुलांकाची माहिती पाहणार आहोत. जर आपण कोणत्याही महिन्याच्या 7, 16 किंवा 25 व्या जन्माला आला असेल तर आपला मुलांक 7 आहे. या मुलांकाचे लोक खूप कष्टकरी आणि बुद्धिमान मानले जातात.
ते प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या विशेष कौशल्यांच्या आणि कठोर परिश्रमांच्या सामर्थ्यावर एक वेगळी ओळख तयार करतात. त्यांच्या आत्मविश्वासामुळे आणि निर्भय स्वभावामुळे, त्यांच्यासारखे लोक आयुष्यात खूपच यशस्वी होतात.
या लोकांना जन्मजात भाग्यवान समजले जाते, कारण हे लोक जे काम हातात घेतात त्या कामात यांना शंभर टक्के यश मिळते. व्यापार, शिक्षण आणि रिसर्च सारख्या क्षेत्रांमध्ये या लोकांचा बोलवाला असतो. अशा क्षेत्रात हे लोक आपल्या कौशल्याच्या जोरावर एक वेगळा ठसा उमटवतात आणि याची छाप सर्वांवर पडते.
हे लोक कोणतेही काम मनापासून करतात आणि याचाच या लोकांना फायदा मिळतो. प्रत्येक काम योजना आखून पूर्ण करणे यात या लोकांचा हातखंडा असतो. यामुळे या लोकांची एक वेगळी ओळख बनत असते.
हे लोक इतरांच्या भावना ओळखतात, यामुळे नेहमीच इतरांचा सन्मान करतात. बुद्धिमत्ता आणि आपला गोड स्वभाव यामुळे हे लोक कोणालाही आपल्याकडे आकर्षित करून घेतात. लोकांच्या मनावर राज्य करणारी ही लोक गॉड गिफ्टेड लक पावर सोबत येतात. या लोकांच बोलण हे फारच प्रभावी असते.
हे लोक आपल्या बोलण्यावरूनच समोरच्याला इम्प्रेस करता. परंतु मुलांक 7 चे लोक राग आल्यावर प्रचंड आक्रमक होतात. राग आल्यानंतर या लोकांचे निर्णय चुकतात. यामुळे यांना नंतर पश्चाताप सुद्धा होतो. पण या लोकांचा राग हा काही क्षणाचा असतो.