Ola ची ग्राहकांना नवीन वर्षाची मोठी भेट ! नवीन स्कूटर लाँच, जुन्या मॉडेलच्या किमतीही झाल्यात कमी

Ola Scooter News : देशात अलीकडे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढलीये. इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. देशातील अनेक दिग्गज ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च केल्या आहेत.

देशातील ज्येष्ठ ईव्ही कंपनी ओला इलेक्ट्रिकने सुद्धा अलीकडेच नवीन उत्पादन श्रेणीचे अनावरण केले आहे. ओला इलेक्ट्रिक ही देशातील प्रमुख इलेक्ट्रिक स्कूटर निर्माती कंपनी.

या कंपनीचे अनेक मॉडेल सध्या बाजारात उपलब्ध आहेत अन ग्राहकांमध्ये या कंपनीचेअनेक मॉडेल लोकप्रिय आहेत. दरम्यान, कंपनीने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत बनवलाय.

31 जानेवारी रोजी ओला जनरेशन 3 इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आले आहेत. हे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर जुन्या मॉडेलपेक्षा अधिक प्रगत आणि नवीन तंत्रज्ञानासह सुसज्ज आहेत.

हे इलेक्ट्रिक स्कूटर नवीन प्लॅटफॉर्मवर तयार केले गेले आहेत. हे नवीन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीने 4 व्हेरिएंटमध्ये सादर केले आहे आणि त्यामध्ये 2-3 बॅटरी पॅक देण्यात आले आहेत. तथापि, कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे.

जनरेशन 3 स्कूटर लॉन्च केल्यानंतरही कंपनीने जनरेशन 2 इलेक्ट्रिक स्कूटर बंद केलेले नाही. ओला जनरेशन 2 इलेक्ट्रिक स्कूटर अजूनही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असतील. ग्राहकांसाठी आनंदाची गोष्ट अशी की, हे जुने मॉडेल कमी किंमतीत मिळणार आहेत.

जनरेशन 2 च्या किमती किती कमी झाल्यात?

ओला कंपनीने जनरेशन 3 या नवीन स्कूटरच्या लॉन्चिंग नंतर एक मोठा निर्णय घेतला आहे आणि जुन्या मॉडेलच्या किंमतींमध्ये सूट जाहीर केली आहे. कंपनीने ओला जनरल 2 ही इलेक्ट्रिक स्कूटर सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे अन हे इलेक्ट्रिक स्कूटर स्वस्त किंमतीत उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

हे स्कूटर विशेष सवलतीसह खरेदी केले जाऊ शकतात. कंपनीने घोषित केले आहे की, ओलाच्या जनरेशन दोनच्या स्कूटरवर ग्राहकांना 35,000 पर्यंत सूट मिळणार आहे.

या सवलतीमुळे जनरेशन दोनच्या एस 1 प्रो आणि एस 1 एक्स (2 केडब्ल्यूएच, 3 केडब्ल्यूएच, आणि 4 केडब्ल्यूएच) मॉडेलच्या एक्स-शोरूमची किंमत अनुक्रमे 1,14,999, ₹ 69,999, ₹ 79,999 आणि ₹ 89,999 इतकी झाली आहे. दरम्यान आता आपण कंपनीने लॉन्च केलेल्या जनरेशन 3 च्या स्कूटर च्या किमती जाणून घेणार आहोत.

ओला जनरेशन 3 स्कूटरची किंमत

एस1 प्रो+ (5.3 केडब्ल्यूएच) – 1,69,999
एस1 प्रो+ (4 केडब्ल्यूएच) – ₹ 1,54,999
एस1 प्रो (4 केडब्ल्यूएच आणि 3 केडब्ल्यूएच) – 1,34,999 आणि ₹ 1,14,999
एस1 एक्स – ₹ 79,999 (2 केडब्ल्यूएच), ₹ 89,999 (3 केडब्ल्यूएच) आणि, 99,999 (4 केडब्ल्यूएच)
एस 1 एक्स+ (4 केडब्ल्यूएच) – 1,07,999