Old Refrigerator Maintenance Tips : सध्या पावसाळ्याचा सीजन सुरू आहे, यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परिणामी आता पंख्याचा आणि एसीचा वापर कमी झाला आहे. कुलरचा वापर देखील कमी झाला आहे. पण फ्रिज चा वापर मात्र बाराही महिने सुरूच राहतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये फ्रिज चा वापर वाढतो हे खरे असले तरी देखील पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुद्धा फ्रिज वापरले जाते.
फळे, भाजीपाला, कोल्ड्रिंक्स अशा वस्तू फ्रिजमध्ये ठेवल्या जातात आणि यासाठी फ्रीज बाराही महिने सुरूच राहते. यामुळे अलीकडे फ्रिजची मागणी वाढलेली आहे आणि याची रेट सुद्धा वाढलेले आहेत. अशा परिस्थितीत जर नवीन फ्रिज घ्यायचे म्हटले तर सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी कात्री बसत असते.

पण आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे जुने फ्रीजचं नव्या सारखे काम करणार आहेत. आज आम्ही तुम्हाला अशा सात टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे दहा वर्षांपूर्वीचे जुने फ्रीज सुद्धा नव्या सारखे काम करू शकते. टेक्निशियन लोकांनी जुन्या फ्रिजच्या मेंटेनन्स संदर्भातील सात महत्त्वाच्या टिप्स सांगितल्या आहेत.
या टिप्स फॉलो करा जुने फ्रिज पण नव्यासारखे काम करणार
डीफ्रॉस्टिंगची काळजी घ्या : जर तुमच्याकडील रेफ्रिजरेटर तुम्हाला जास्त काय टिकवायचे असेल आणि तुमचे फ्रीज मॅन्युअल डीफ्रॉस्टवाले असेल तर अशावेळी तुम्हाला अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. मॅन्युअल डिफ्रॉस्ट असणाऱ्या फ्रीजला आठवड्यातून किमान एकदा डीफ्रॉस्ट करावे असा सल्ला टेक्निशियन कडून देण्यात आला आहे. यामुळे फ्रिजची लाईफ वाढत असते.
एलईडी लाईट्स वापरा : तुमच्याकडे जुने फ्रीज असेल आणि तुम्हाला त्याला जर नव्या सारखे चमकवायचे असेल तर तुम्ही तुमच्या जुन्या रेफ्रिजरेटरमध्ये एलईडी लाईट्स बसवावेत. यामुळे अंतर्गत दृश्य सुधारते आणि वीज देखील वाचत असते.
डेंट्स आणि स्क्रॅचेस दूर करण्याचे उपाय : तुमचे फ्रिज बाहेरून जुने झालेले असेल त्यावर dents असतील, स्क्रॅचेस असतील तर तुम्ही कार वॅक्स किंवा पॉलिशिंग क्रीमचा वापर करायला हवा डेंट्स आणि स्क्रॅचेस लपवता येतात. असे केल्याने तुमचे जुने फ्रीज सुद्धा नव्या सारखे दिसणार आहे.
बेकिंग सोड्याचा वापर : तुमचे जुने फ्रीज आतून चमकवायचे असेल तर यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करा. बेकिंग सोडा आणि पाण्याचे द्रावण बनवा आणि रेफ्रिजरेटरच्या आतील भाग स्वच्छ करा. यामुळे फ्रिज मधून येणारा वास दूर होतो आणि बाहेरून तसेच आतूनही फ्रीज नवे होते.
रबर गॅस्केट स्वच्छ करा : तुम्हाला तुमच्या फ्रिजचे आयुष्य वाढवायचे असेल तर तुम्हाला रबर गॅस्केट व्यवस्थित स्वच्छ करावी लागणार आहे. रेफ्रिजरेटरचा दरवाजा व्यवस्थित बंद झाला नाही तर तर त्याच्या कुलिंग सिस्टम वर परिणाम होत असतो. म्हणून वेळोवेळी गॅस्केट गरम पाणी आणि साबणाने स्वच्छ करायला हवे.
कंडेन्सर कॉइल्सची काळजी घ्या : टेक्निशियन असे सांगतात की, रेफ्रिजरेटरच्या मागे असलेल्या कॉइल्समध्ये धूळ साचल्याने थंड होण्याची कार्यक्षमता कमी होते. म्हणूनच प्रत्येक सहा महिन्यांनी ब्रश किंवा व्हॅक्यूमने कंडेन्सर कॉइल्सची स्वच्छता केली गेली पाहिजे असे केल्याने तुमच्या फ्रीजच आयुष्य वाढणार आहे.
दरवर्षी सर्विसिंग करा : फ्रीज कितीही जुने असले तरी देखील ते चांगले काम करू शकते मात्र यासाठी तुम्हाला दरवर्षी फ्रिजची सर्विसिंग करावी लागणार आहे.