365 दिवसांच्या FD योजनेतुन मिळणार जबरदस्त रिटर्न, देशातील प्रमुख 10 बँकांचे FD वरील व्याजदर पहा….

आरबीआय ने निर्णय घेतल्यानंतर अजूनही देशातील बँकांचे एफ डी वरील व्याजदर तसेच कायम आहेत. यात अजून कपातीचा कोणताच निर्णय झालेला नाही. पण आगामी काळात बँकांकडून एफडी वरील व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे.

Tejas B Shelar
Published:

One Year FD Yojana : तुम्ही तुमची बचत मुदत ठेव (FD) मध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त राहणार आहे. खरंतर आरबीआय ने नुकताच रेपो रेटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. आपणास माहीतच असेल की रेपो रेटमध्ये कपात झाली की सर्व प्रकारचे कर्ज स्वस्त होतात.

यासोबतच एफडी वरील व्याजदर देखील कमी केले जातात. यामुळे आरबीआयच्या या निर्णयाचा काही लोकांना फायदा होणार असला तरी देखील काही लोकांचे यामुळे नुकसान सुद्धा होणार आहे.

ज्या लोकांना फिक्स डिपॉझिट मध्ये गुंतवणूक करायची असेल त्यांना आरबीआयचे निर्णयाचा नक्कीच फटका बसणार आहे. पण आरबीआय ने निर्णय घेतल्यानंतर अजूनही देशातील बँकांचे एफ डी वरील व्याजदर तसेच कायम आहेत.

यात अजून कपातीचा कोणताच निर्णय झालेला नाही. पण आगामी काळात बँकांकडून एफडी वरील व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. पण सध्या तरी देशातील मोठ्या सरकारी आणि खाजगी बँका त्यांच्या ग्राहकांना FD वर बंपर व्याज देत आहेत.

अनेक बँका ग्राहकांना 1 वर्षाच्या FD वर जास्तीत जास्त 7.75 टक्के व्याज देत आहेत. या बँकांमध्ये एसबीआयचाही समावेश आहे. दरम्यान आज आपण 365 दिवसांच्या म्हणजेच एक वर्षाच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देणाऱ्या बँकांची यादी पाहणार आहोत.

या बँका देतात सर्वाधिक व्याज

तामिळनाडू मर्कंटाइल बँक : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या FD वर 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75 टक्के व्याज देत आहे.

कॅनरा बँक : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या FD वर 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50 टक्के व्याज देत आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 6.80 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.30 टक्के व्याज देत आहे.

DCB बँक : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या FD वर 7.25 टक्के दराने तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.75 टक्के दराने व्याज देत आहे.

कर्नाटक बँक : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या FD वर 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.40 टक्के व्याज देत आहे.

बँक ऑफ बडोदा : ही बँक सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 6.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.25 टक्के व्याज देत आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया : ही बँक सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर 6.75 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.25 टक्के व्याज देत आहे.

ड्यूश बँक : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या एफडीवर सात टक्के दराने आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.40% दराने व्याज देत आहे.

RBL बँक : आरबीएल बँक आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी 1 वर्षाच्या FD वर 7 टक्के आणि ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50 टक्के दराने व्याज देत आहे.

बँक ऑफ इंडिया : ही बँक आपल्या सामान्य ग्राहकांना 1 वर्षाच्या FD वर 7 टक्के तर ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना 7.50 टक्के व्याज देत आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe