Onion New Variety : कांदा हे एक नगदी पीक आहे मात्र कांद्याच्या बाजारभावात सातत्याने फेरबदल पाहायला मिळतात. त्यामुळे हे नगदी पीक शेतकऱ्यांसाठी अनेकदा तोट्याचा व्यवहार सिद्ध होते. सध्या तर बाजारात कांद्याला पाच ते सहा रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे. अशा परिस्थितीत कांदा पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढणे शेतकऱ्यांसाठी मुश्किल होत आहे. सध्या बाजारात लाल कांद्याची आवक होत असून हा लाल कांदा अधिक काळ साठवून ठेवता येत नाही.
लाल कांदा दिसायला आकर्षक असतो परिणामी बाजारात याला मागणी असते. मात्र लाल कांदा अधिक काळ साठवून ठेवता येत नसल्याने काढणी केल्यानंतर लागलीच बाजारात मोठ्या प्रमाणात याची आवक होते परिणामी याला चांगला दर मिळत नाही. मात्र आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक खुशखबर समोर येत आहे. कांद्याचे एक नवीन वाण विकसित झाले असून हे वाण दिसायला लाल कांद्याप्रमाणेच असून याची टिकवण क्षमता मात्र उन्हाळी कांद्याप्रमाणे आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा निश्चितच फायदा या ठिकाणी होणार आहे. राष्ट्रीय बागवानी अनुसंशोधन केंद्र चितेगाव तालुका निफाड या संशोधन संस्थेने हे नवीन वाण विकसित केले आहे. लाल रंगाच्या कांद्याला बाजारात मागणी असल्याने हे नवीन कांद्याचे वाण विकसित झाले आहे. या कांद्याला एन एच आर डी एफ फुरसुंगी असे नाव देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या नवीन जातीपासून हेक्टरी 400 क्विंटल पर्यंतचे उत्पादन मिळणार आहे.
लागवड केल्यानंतर मात्र 110 ते 120 दिवसात यापासून उत्पादन मिळू शकणार आहे. तसेच या कांद्याची टिकवण क्षमता पाच ते सात महिने राहील असं सांगितलं जात आहे. एवढेच नाही तर या नवीन जातीवर करपा आणि मावा रोगाचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होणार आहे. साठवणुकीत या कांद्याचा कलर देखील काळपट होणार नाही, कलर बदलणार नाही असा दावा केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार 15 ऑगस्ट पासून हे बियाणे शेतकऱ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
हे पण वाचा :- 12वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना मध्ये 2859 पदाची मेगा भरती, आजच Apply करा
चितेगाव येथील संशोधन केंद्रावर हे बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध होईल अशी माहिती देण्यात आली आहे. शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार रब्बीसाठी लाल कांद्यामध्ये संशोधन करण्यात आले असून हे नवीन वाण विकसित केले आहे. दरम्यान या जातीच्या कांदा बियाण्याच्या किमती बाबत अद्याप माहिती हाती आलेली नाही मात्र लवकरच ही देखील माहिती समोर येणार आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र राज्यात कांद्याचे उत्पादन सर्वाधिक आहे. खरीप हंगामाच्या तुलनेत रब्बी आणि उन्हाळी हंगामात कांदा उत्पादन आपल्या राज्यात अधिक आहे. हेच कारण आहे की या नवीन वाणाची निर्मिती शास्त्रज्ञांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. जाणकार लोकांनी या नवीन जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळेल असा दावा या निमित्ताने केला आहे.
हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो, खरीप हंगामात ‘हे’ एक काम कराच लाखोत होणार कमाई; पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांना सल्ला