Onion Rate : तुम्ही शेतकरी असाल त्यातल्या त्यात शेतात कांदा लागवड केली असेल तर आजची बातमी तुमच्यासाठी खास करणार आहे तुम्ही ही बातमी शेवटपर्यंत वाचायला हवी. खरे तर कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक.
या पिकाचे शेतकऱ्यांच्या आयुष्यात तर महत्त्व आहेच शिवाय हे पीक राजकारणात सुद्धा गेम चेंजर ठरतं. कांदा पिकामुळे कित्येकांचे सत्तेत येण्याचे स्वप्न धुळीस मिळाले आहे तर कित्येकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.

पण थेट राजकारण फिरवणार हे पीक शेतकऱ्यांना पण चांगलेच धारेवर धरत. कधी कांद्याचे चांगले उत्पादन होते तर कधी अपेक्षित उत्पादन होत नाही आणि जर चांगले उत्पादन झालेच तर याला चांगला बाजार भाव मिळणार हे फिक्स नाही.
कांदा हे जलद गतीने खराब होणार पीक आहे विशेषता लाल कांदा म्हणजेच जो कांदा पावसाळ्यात लावला जातो तो कांदा लवकर खराब होतो. शिवाय शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्यासाठी आधुनिक बराकी किंवा चाळी सुद्धा उपलब्ध नाहीत.
अशा स्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनेकदा कांदा काढणी झाल्याबरोबर विकावा लागतो आणि अशावेळी जर दर कमी मिळत असेल तर शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कांदा बाजारात सतत चढ-उतार सुरू आहे आणि अशातच आता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर येत आहे आणि ती पण थेट बांगलादेशातून.
या बातमीमुळे सध्या शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात समाधानाचे वातावरण आहे कारण की बातमी कांदा बाजाराशीं निगडित आणि बाजारभावबाबत सकारात्मक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बांगलादेशने भारतातून कांदा आयातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतलाय.
गेल्या अनेक दिवसांपासून याची वाट पाहिली जात होती आणि अखेर बांगलादेशने हा निर्णय घेतलाय. दरम्यान बांगलादेश सरकारने घेतलेला हा निर्णय प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या शेतकऱ्यांना फायदा देणारा आहे.
या निर्णयाचा थेट फायदा शेतकरी व निर्यातदारांना होणार अशी आशा आहे. 7 डिसेंबरपासून दररोज 30 टन क्षमतेच्या तब्बल 50 आयात परवान्यांचे (IP) वाटप करण्यात येणार असून, यासाठी आधीच अर्ज केलेल्या आयातदारांनाच परमीट दिले जाणार आहेत.
या निर्णयामुळे सुमारे 15 हजार क्विंटल कांद्याची दररोज निर्यात भारतातून बांगलादेशात होऊ शकणार आहे. कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे राज्याध्यक्ष भारत दिघोळे यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मात्र तरीही कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी शाश्वत उपाय योजनांची मागणी यावेळी उपस्थित केली आहे. बांगलादेश सरकारचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी तात्पुरता दिलासा देणारा राहणार आहे.
जर कांदा उत्पादकांच्या समस्या कायमच्या सोडवायचे असतील शाश्वत उपाययोजना करायच्या असतील तर एक विशेष प्लॅन तयार करण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली.













