Onion Rate : कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कांदा बाजार भावात सातत्याने चढ-उतार सुरू होते.
मात्र आता कांद्याचे दर तेजीत आले आहेत आणि आज राज्यातील एका महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांद्याला तब्बल 5,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला असून यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड समाधानाचे वातावरण आहे.

दरम्यान, आज आपण राज्यातील कोणत्या बाजारांमध्ये आज कांद्याला सर्वाधिक दर मिळाला आहे याची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या बाजारात कांद्याला मिळाला विक्रमी भाव
उमराणे कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याची साडेदहा हजार क्विंटल आवक झाल्याची नोंद करण्यात आली. या बाजारात कांद्याला किमान 1000, कमाल 5000 आणि सरासरी 3200 रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला.
चांदवड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याची 5000 क्विंटल आवक झाल्याची नोंद करण्यात आली आहे. इथं किमान 500, कमाल 4700 आणि सरासरी 2250 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला.
लासलगाव विंचुर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लाल कांद्याची 1230 क्विंटल आवक झाली. येथे कांद्याला किमान 700 रुपये, कमाल 4848 रुपये आणि सरासरी 2500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात पोळ कांद्याची 5000 क्विंटल आवक झाली. येथे कांद्याला किमान पाचशे रुपये, कमाल 4151 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 2300 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात लोकल कांद्याची 403 क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे कांद्याला किमान शंभर, कमाल 4000 आणि सरासरी 2050 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात कांद्याला किमान 100 कमाल 3100 आणि सरासरी 2300 रुपये प्रति













