Onion Rate : कांदा उत्पादकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे. कांदा महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर सहित अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे महत्त्वाचे पीक. या पिकावर राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असल्याचे चित्र आहे.
मात्र कांदा कधी वांदा करेल हे काही सांगता येत नाही. कधी कांद्याला फारच विक्रमी भाव मिळतो तर कधी अगदीच कवडीमोल दरात याची विक्री करावी लागते.

यामुळे कांदा हे पीक अनेकदा शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरते. दरम्यान संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी कांद्याला महाराष्ट्रातील एका बड्या बाजारात चांगला विक्रमी भाव मिळाला.
संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी अर्थात 15 जानेवारी रोजी राज्य कृषी पणन महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध माहितीनुसार राज्यातील 13 बाजारांमध्ये आज कांद्याचे लिलाव पार पडलेत. यामध्ये वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला आहे.
कांद्याचे दर चार हजाराच्या पार
वाई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज कांद्याला किमान 3000 सरासरी 4000 आणि कमाल 4500 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला असल्याची माहिती समोर आली अशी. पण बाजारात फक्त दहा क्विंटल लोकल कांद्याची आवक झाली होती.
इतर बाजारांमध्ये सरासरी बाजारभाव दोन हजाराखाली
| मार्केट | बाजारभाव |
| जुन्नर-ओतूर कृषी उत्पन्न बाजार समिती | कमाल 2400, सरासरी अठराशे रुपये |
| संगमनेर | कमाल दोन हजार 27, सरासरी 1114 |
| कामठी Apmc | कमाल 2020, सरासरी 1770 रुपये |
| राहुरी वांबोरी मार्केट | कमाल दोन हजार रुपये, सरासरी तेराशे रुपये |
| सातारा एपीएमसी | कमाल दोन हजार रुपये, सरासरी बाराशे पन्नास रुपये |













