Onion Rate : राज्यातील कांदा उत्पादकांसाठी आज थोडीशी दिलाचा दर बातमी समोर आली आहे ती म्हणजे पुन्हा एकदा बाजारभावात थोडी तेजी दिसून आली आहे. कांदा हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्वाचे पीक म्हणून ओळखले जाते.
कांद्याची लागवड खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात होते. कांद्याचे राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये उत्पादन घेतले जाते मात्र सर्वात जास्त उत्पादन उत्तर महाराष्ट्रातील नाशिक मध्ये होते. राज्यातील बहुतांशी कांदा उत्पादन हे नाशिक जिल्ह्यातच पाहायला मिळते.

दरम्यान सध्या स्थितीला कांद्याची सर्वात जास्त आवक नाशिक जिल्ह्यातच होत आहे. महाराष्ट्र राज्य पणन महामंडळाच्या अधिकृत साइटवरून मिळालेल्या माहितीनुसार आज नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त कांदा आवक झाली.
तसेच आज कांद्याला आठशे रुपयांपासून ते 2300 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा सरासरी भाव मिळाला आहे. दरम्यान आता आपण राज्यातील कोणत्या बाजारात कांद्याला सर्वाधिक भाव मिळाला याची माहिती या लेखातून जाणून घेऊया.
इथे मिळाला कांद्याला सर्वाधिक भाव
कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या बाजारात कांद्याला सर्वाधिक 3300 प्रतिक्विंटल असा कमाल भाव मिळाला आहे. परंतु सरासरी 1700 रुपये प्रति क्विंटल असाच दर नमूद करण्यात आला.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला कमाल 2700 प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. तसेच सरासरी भाव 1850 रुपये एवढा राहिला.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : इथं कांद्याला कमाल 2560 रुपये प्रत्येक क्विंटल असा भाव मिळाला तर सरासरी बाजार भाव 2310 रुपये प्रति क्विंटल असा राहिला.
चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये कांद्याला कमाल पंचवीसशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला असल्याची नोंद करण्यात आली. पण सरासरी बाजार भाव 2300 रुपये प्रति क्विंटल एवढाच राहिला.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : आज या मार्केटमध्ये पोळ कांद्याला 2525 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला असून सरासरी बाजार भाव 1450 रुपये प्रति क्विंटल इतका राहिला.