महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! कांदा बाजारभाव आता पुढील इतके दिवस वाढतच राहणार, का

Published on -

Onion Rate : महाराष्ट्र हे कांदा उत्पादनात सर्वात अग्रेसर राज्य. राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. नाशिक, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, धुळे, जळगाव सहित राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी-अधिक प्रमाणात कांद्याचे उत्पादन घेतले जाते.

यातील नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादनात सगळ्यात टॉपला आहे. जिल्ह्यातील कसमादे पट्टा म्हणजेच कळवण,सटाणा, मालेगाव, देवळा या तालुक्यातील शेतकरीबांधव कांद्याचे सर्वाधिक उत्पादन घेताना दिसतात.

दरम्यान, राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि तेवढीच दिलासादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेश सरकारने कांदा आयातीबाबत नुकताच एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

खरे तर अलीकडेच बांगलादेशने कांदा आयात करण्यास परवानगी दिली होती आणि या निर्णयामुळे भारतातून मोठ्या प्रमाणात कांदा बांगलादेशला निर्यात होत होता. दरम्यान आता बांगलादेश सरकारने कांदा आयातीबाबत मोठा निर्णय घेतला असून आयात परवान्यांची संख्या 50 वरून थेट 200 परवान्यांपर्यंत करण्यात आली आहे.

आता या निर्णयाचा थेट फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. आयात परवान्यांची संख्या वाढल्यामुळे भारतातून बांगलादेशात जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीला आणखी वेग येणार आणि मोठ्या प्रमाणात कांदा बांगलादेशात निर्यात होणार अशी माहिती जाणकारांकडून देण्यात आली आहे.

याचाच सकारात्मक परिणाम देशातील कांदा बाजारात पाहायला मिळणार आहे देशांतर्गत कांदा बाजारभाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आता व्यक्त होत आहे.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की काही दिवसांपूर्वीच बांगलादेश सरकारने तेथील कांदा बाजारपेठेत दर नियंत्रणात ठेवण्यासाठी 7 डिसेंबर पासून कांदा आयातीवर काही निर्बंध लागू केले होते. मात्र आता तेथे मागणी वाढली आहे आणि बाजारात कांदा कमी झाला आहे.

यामुळे आता तेथील सरकारने पुन्हा एकदा आयात परवान्यांची संख्या वाढवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय त्यामुळे आता भारतीय कांद्याला पुन्हा एकदा मोठा बाजार उपलब्ध होईल आणि बांगलादेशात मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात होईल अशी आशा व्यक्त होत आहे.

असे घडले तर याचा कांदा निर्यात करणाऱ्या निर्यातदारांना आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. बांगलादेशने भारतीय कांद्याची आयात अलीकडेच सुरू केली आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये बांगलादेशात 1500 टन कांदा भारतातून दाखल झाला अशी माहिती समोर आली आहे.

याचाच परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारात कांद्याचे दर तेजीत आले आहेत. दरम्यान आता कांदा आयात परवान्यांची संख्या 50 वरून 200 करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय बांगलादेश सरकारने घेतलाय. यामुळे आता बाजार भाव पुन्हा एकदा वाढू शकतात अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान बांगलादेशच्या कृषी मंत्रालयाने बाजारात स्थिरता येईपर्यंत आणि पुढील आदेश मिळेपर्यंत भारतातून होणारी कांदा आयात प्रक्रिया सुरू राहणार अशी महत्त्वाची माहिती दिली आहे.

अर्थातच येत्या काळात कांद्याच्या निर्यातीमध्ये असेच सातत्य राहू शकते. म्हणजेच पुढील काही दिवस तरी भारतीय बाजारात कांद्याला अपेक्षित भाव मिळू शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News