UPI Payment Limit:- सध्या भारताचा विचार केला तर मोठ्या प्रमाणावर ऑनलाइन पेमेंटचा ट्रेंड वाढला असून मोठ्या प्रमाणावर यूपीआयचा वापर करून आर्थिक व्यवहार केले जातात. जर आपण यूपीआय पेमेंटचा विचार केला तर भारतामध्ये 2023 मध्ये तब्बल शंभर अब्जचा टप्पा पार केला गेला.
या संपूर्ण वर्षांमध्ये जवळजवळ 118 अब्ज रुपयांची पेमेंट हे यूपीआयच्या माध्यमातून करण्यात आली. गेल्या वर्षाच्या तुलनेत पाहिले तर ही वाढ तब्बल 60 टक्क्यांची आहे. यावरून आपल्याला यूपीआय पेमेंटचा ट्रेंड किती वाढणार आहे याबाबत अंदाज येतो.

ऑनलाइन पेमेंट चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात असला तरी देखील यामध्ये पेमेंट पाठवण्याची एक मर्यादा निर्धारित करण्यात आलेली होती व त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर समस्या निर्माण होत होत्या.
परंतु या नवीन वर्षाच्या सुरुवातीला केंद्र सरकारच्या माध्यमातून एक नवीन भेट या संदर्भात देण्यात आलेली असून आता यूपीआयच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या पेमेंटची मर्यादा आता वाढवण्यात आलेली आहे.
सरकारने वाढवली ऑनलाइन पेमेंटची मर्यादा
याबाबत सविस्तर वृत्त असे की, केंद्र सरकारच्या माध्यमातून एका दिवसाला एक लाख रुपये पेक्षा जास्त व्यवहारांवर बंदी घालण्यात आलेली होती. मात्र आता एनपीसीआय अर्थात नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आरबीआयच्या सहकार्याने यावर एक उपाय शोधला व आता पाच लाख रुपयांचे यूपीआय पेमेंट एकाच वेळी करता येणार आहे.
परंतु यामध्ये काही अटी पाळणे देखील गरजेचे आहेत. तुम्ही आता हॉस्पिटल आणि शैक्षणिक संस्था सारख्या अत्यावश्यक ठिकाणी पेमेंट करताना एकावेळी पाच लाख रुपयांचे ऑनलाईन पेमेंट करू शकणार आहात. 10 जानेवारीपासून हा नवा नियम लागू होणार आहे.
म्हणजेच 10 जानेवारीपासून आता सर्व शैक्षणिक संस्था आणि हॉस्पिटलची बिल भरण्याकरिता एकावेळी कमाल पाच लाख रुपये भरता येणार आहेत.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांसाठी एक लाख ते पाच लाख रुपयांची पेमेंट मर्यादा लागू केली होती.
व्यापाऱ्यांनी वाढीव मर्यादेसह पेमेंट मोड म्हणून यूपीआय सक्षम करणे आवश्यक आहे. सध्या एमपीएससीआयच्या माध्यमातून पेमेंट मर्यादा एक लाख रुपये प्रत्येक दिवसाला ठेवण्यात आलेली आहे. मागील झालेल्या पतधोरण आढावा बैठकीमध्ये रिझर्व बँक ऑफ इंडियाने पाच लाख रुपये पेमेंट मर्यादा प्रस्तावित केली होती. त्यामुळे आता गुगल पे आणि फोन पे व पेटीएम सारख्या ॲप्सना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.













