नाबार्डमध्ये 44 ते 89 हजार रुपये दरमहा पगार मिळवण्याची संधी! या पदांवर भरती सुरू; पटकन करा अर्ज !

nabard

सध्या अनेक शासकीय विभागाच्या अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू असून त्यासोबतच रेल्वे आणि बँकिंग क्षेत्रामध्ये अनेक भरतीच्या नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहेत. दहावी पास ते पदवीधर व इतर उच्च पदवीधारक तरुण- तरुणींकरता या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. अगदी त्याचप्रमाणे जर आपण राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डचा दृष्टीने बघितले तर यामध्ये देखील आता विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून वेगवेगळ्या पदांच्या जवळपास 102 जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. त्यामुळे जे उमेदवार इच्छुक आणि पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.

एकूण रिक्त पदे

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्डच्या माध्यमातून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे व ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने 102 रिक्त पदांसाठी राबवली जाणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज कसा करावा?

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेच्या माध्यमातून राबवली जाणाऱ्या या भरती प्रक्रियेसाठी जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.

परीक्षा कधी होईल?

नाबार्डच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या या रिक्त पदांच्या भरतीसाठीची निवडीसाठीची परीक्षा ही सप्टेंबर 2024 मध्ये घेण्यात येणार आहे.

काय आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख?

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या माध्यमातून 102 रिक्त पदांच्या भरती करिता राबवण्यात येणाऱ्या भरती प्रक्रिया करिता जे उमेदवार इच्छुक व पात्र असतील त्यांनी 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

पदांचे नाव आणि रिक्त जागांची संख्या

1) असिस्टंट मॅनेजर( ग्रेड A)(RDBS)- एकूण रिक्त पदे 100

2) असिस्टंट मॅनेजर( ग्रेड A)( राजभाषा)- एकूण रिक्त जागा दोन

पदनिहाय आवश्यक शैक्षणिक पात्रता

1) असिस्टंट मॅनेजर( ग्रेड A)(RDBS)- या पदासाठी उमेदवार हा संबंधित विषयात पदवीधर/BE/B.Tech/MBA/BBA/BMS/P.G. डिप्लोमा/CA

2) असिस्टंट मॅनेजर( ग्रेड A)( राजभाषा)- या पदासाठी इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य

आवश्यक वयोमर्यादा

अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय एक जुलै 2024 रोजी 21 ते 30 वर्ष असणे गरजेचे आहे. वयामध्ये एससी/ एसटी कॅटेगिरीतील उमेदवारांना पाच वर्षाची सूट देण्यात आली आहे तर इतर मागास प्रवर्ग अर्थात ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षे वयात सूट आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल वेतन?
या पदांसाठी ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना 44500 ते 89150 रुपये दरमहा वेतन दिले जाईल.

निवड झालेल्या उमेदवारांचे नोकरीचे ठिकाण कोणते असेल?

राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक अर्थात नाबार्डच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या भरती प्रक्रियेमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांची नियुक्ती भारतात कुठेही करण्यात येईल. म्हणजेच संपूर्ण भारत हे नोकरी करण्याचे ठिकाण असणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe