Pan And Aadhar Card Link : पॅन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. खरे तर भारतात पॅन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन अतिशय महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत. या दोन्ही कागदपत्रांविना भारतात कोणतेही काम करणे अशक्य आहे. हे दोन्ही डॉक्युमेंट शासकीय कामांसाठी आवश्यक असतात.
पॅन कार्ड बाबत बोलायचं झालं तर हे वित्तीय कामांमध्ये उपयोगी पडते. दरम्यान केंद्रातील सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यास सांगितले आहे.
अशातच आयकर विभागाने करदात्यांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. यानुसार करदात्यांनी त्यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड 31 मे 2024 पर्यंत लिंक करणे अनिवार्य आहे.
31 मे पर्यंत जे करदाते पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणार नाहीत त्यांना दुप्पट टीडीएस द्यावा लागणार असल्याचे या सूचनेत म्हटले गेले आहे.
यामुळे जर तुम्हीही अजून पर्यंत तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर हे काम करावे लागणार आहे. अन्यथा तुमच्याकडून दुप्पट टीडीएस आकारला जाईल आणि यामुळे साहजिकच तुम्हाला मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.
अशा परिस्थितीत आता आपण पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस नेमकी कशी आहे याविषयी अगदी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची प्रोसेस कशी आहे
पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. incometaxindiaefiling.gov.in या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर तुम्हाला क्विक लिंक या सेक्शन मध्ये जायचे आहे.
तिथे तुम्हाला लिंक आधार या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. यानंतर तुमचा पॅन कार्ड नंबर आणि आधार कार्ड क्रमांक टाकून तुम्हाला व्हॅलिडेट करावे लागणार आहे.
यानंतर मग आधार कार्डमध्ये असलेलं नाव, मोबाईल नंबर नोंदवून Link Aadhar यावर क्लिक करायचे आहे. मोबाईल नंबर नोंदवून त्यावर येणाऱ्या ओटीपीसह Validate वर क्लिक करायचे आहे. ही प्रोसेस केल्यानंतर तुमचे पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक होणार आहे.