Pan Card News : पॅन कार्ड धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पॅन कार्ड हा प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचा पुरावा आहे. आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड सुद्धा आवश्यक असते. सर्व प्रकारच्या वित्तीय कामांसाठी तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असते.
शासकीय तसेच निम शासकीय कामांमध्ये पॅन कार्डचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. पॅन कार्ड नसेल तर अनेक गोष्टी अडकतात. महत्वाची बाब म्हणजे तुमचे पॅन कार्ड हे अपडेटेड असणे आवश्यक आहे. दरम्यान आता पॅन कार्ड धारकांसाठी शासनाने एक नवीन नियम आणला आहे.

नव्या नियमानुसार आता पॅन कार्ड आधार कार्ड सोबत लिंक करणे बंधनकारक करण्यात आले असून जे लोक आपले पॅन कार्ड आधार ला लिंक करणार नाही त्यांचे पॅन कार्ड निष्क्रिय होणार असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे शासनाने यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिलेली आहे.
जे लोक 31 डिसेंबर पर्यंत हे काम पूर्ण करणार नाही त्यांचे पॅन कार्ड एक जानेवारी 2026 पासून निष्क्रिय होणार आहे. यामुळे जर तुम्हीही अजून तुमचे पॅन कार्ड आधार सोबत लिंक केलेले नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे अन्यथा तुम्हाला नव्या वर्षात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
तुमचे पॅन कार्ड जर डी ऍक्टिव्हेट झाले म्हणजेच निष्क्रिय झाले तर तुम्हाला ते कोणत्याच कामासाठी वापरता येणार नाही. यामुळे तुमचे सरकारी काम तसेच आर्थिक व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे.
पॅन कार्ड डीऍक्टिव्हेट झाल्यानंतर इनकम टॅक्स रिटर्न फाइलिंग, बँक व्यवहार, म्युच्युअल फंड, किंवा इतर आर्थिक सेवांसाठी हे कार्ड अमान्य ठरणार आहे. आता तुम्हाला तुमचे पॅन कार्ड आधार सोबत लिंक करायचे असेल तर https://www.incometax.gov.in/iec/foportal/ या अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे लागणार आहे.
यानंतर तुम्हाला वेबसाईटवर दिसणाऱ्या आधार लिंक या पर्यायावर क्लिक करायचे आहे. यानंतर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड क्रमांक टाकावा लागणार आहे. यासाठी तुम्हाला एक हजार रुपये फी सुद्धा भरावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाली की मग तुमचे पॅन कार्ड आधार सोबत लिंक होईल. या प्रक्रियेनंतर तुमचे पॅन कार्ड एक जानेवारी नंतर सुद्धा सुरू राहणार आहे.













