Pan Card Update : पॅन कार्ड हे आधार कार्ड प्रमाणेच एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. पॅन कार्ड हा एक ओळखीचा पुरावा तर आहेच सोबतच वित्तीय कामकाजांमध्ये या कागदपत्राची फार गरज भासते. हे वित्तीय कामकाजांमध्ये आवश्यक असणारे एक महत्त्वाचे डॉक्युमेंट असल्याने यामधील माहिती ही योग्यरीत्या भरलेली असणे आवश्यक आहे.
जर पॅन कार्ड मधील माहिती चुकीची असेल तर तुमची अनेक कामे अडकू शकतात. यामुळे तुमचे पैशांचे व्यवहार प्रभावित होऊ शकतात. जर तुम्ही कर्ज घेण्याच्या तयारीत असाल अन पॅन कार्ड मध्ये काही चूक असेल तर तुम्हाला कर्ज नाकारले जाऊ शकते.

यामुळे आज आपण पॅन कार्ड मधील चुका घरबसल्या कशा पद्धतीने दुरुस्त केल्या जाऊ शकतात, यासाठी किती रुपयांचे शुल्क भरावे लागते? अशा काही बाबींची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पॅन कार्ड मधील चुका दुरुस्त कशा करणार?
तुमच्या पॅन कार्ड वरील माहिती जर चुकीची असेल आणि तुम्हाला ही माहिती चेंज करायची असेल तर यासाठी तुम्हाला www.incometaxindia.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे. पॅन कार्ड नंबर टाकल्यानंतर तुम्हाला लॉगिन घ्यावे लागेल. लॉगिन घेतल्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड दुरुस्तीचा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म ओपन होईल. या फॉर्ममध्ये विचारलेली सर्व माहिती तुम्हाला अचूक नोंदवावी लागणार आहे. यानंतर तुम्हाला काही कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी लागणार आहेत.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला हा फॉर्म काळजीपूर्वक सबमिट करायचा आहे. मात्र फॉर्म सबमिट करताना तुम्हाला यासाठी लागणारे शुल्क भरावे लागणार आहे. साधारणता पॅन कार्ड दुरुस्तीचा अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला 106 रुपये भरावे लागतात.
हे शुल्क भरल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे. यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल. ही पावती तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी सांभाळून ठेवायची आहे.
एकदा तुम्हाला दुरुस्ती अर्ज सादर करण्याची पावती मिळाली की तुमचा पॅन कार्ड दुरुस्तीचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट झाला आहे असे समजावे. या पावतीवर देण्यात आलेल्या क्रमांकाद्वारे तुम्ही तुमचे नवीन पॅन कार्ड कुठपर्यंत पोहचले आणि हे पॅन कार्ड तुम्हाला कधी मिळू शकते यासारख्या बाबी चेक करू शकता.