Panjab Dakh Monsoon News : मान्सून कधी माघारी फिरणार ? परतीचा पाऊस कधी थांबणार? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होऊ लागले आहेत. दरम्यान याच साऱ्या प्रश्नांचे उत्तर आता ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी दिली आहे. पंजाब रावांनी महाराष्ट्रातुन मान्सून कधीपर्यंत माघारी फिरणार या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे.
तसेच राज्यात आता किती दिवसं पावसाचा जोर कायम राहणार, महाराष्ट्रात प्रत्यक्षात थंडीची चाहूल कधी लागणार? अशाही अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात दिली आहेत. यामुळे, आज आपण पंजाब रावांचा हा नवीन हवामान अंदाज थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

पंजाब रावांचा नवीन अंदाज काय सांगतो?
पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस पावसाची शक्यता आहे. राज्यात जवळपास 19 ते 20 ऑक्टोबर पर्यंत पाऊस सुरू राहणार असा अंदाज पंजाब रावांनी वर्तवला आहे.
पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला मान्सून खानदेशातील जळगाव कडून माघारी फिरणार आहे. 18 तारखेपासून जळगाव कडून मान्सून माघारी फिरेल. नंतर मराठवाडा व आजूबाजूच्या परिसरातून मान्सून माघारी परतणार आहे.
19 ऑक्टोबर पर्यंत राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात सर्व दूर पाऊस पडणार नाही मात्र भाग बदलत पाऊस पडत राहणार आहे. तसेच 21 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे.
ते म्हणतात की, यावर्षी राज्यात पाच नोव्हेंबरला थंडी पडणार आहे. 18 ऑक्टोबरला राज्यातील जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजी नगर, अकोला, अमरावती या भागातून पाऊस परतणार आहे. 19 ऑक्टोबरला जालना व आजूबाजूच्या भागातून मान्सून माघारी फिरणार आहे.
यानंतर मग 21 ऑक्टोबरला राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांमधून मान्सून माघारी फिरणार असा अंदाज पंजाब रावांनी आपल्या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केला आहे.
एकंदरीत 21 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातील सर्वच भागांमधून मान्सून परतणार आहे. त्यानंतर मग थंडीला सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबरला महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असल्याचा अंदाज त्यांनी दिला आहे.