पंजाब डख यांचा नवीन अंदाज : ऑक्टोबर मध्ये कसे राहणार महाराष्ट्रातील हवामान ? दसऱ्याला पाऊस पडणार का ? वाचा सविस्तर….

सर्वात आधी पूर्व विदर्भात मग पश्चिम विदर्भात, पुढे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि मग तो पाऊस कोकणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सप्टेंबर ची जशी पावसाने सुरुवात झाली होती तशीच सुरुवात ऑक्टोबर महिन्याची देखील होणार आहे. 1 अन दोन ऑक्टोबरला राज्यात चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Published on -

Panjabrao Dakh Havaman Andaj : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार? या संदर्भात पंजाब रावांनी नवीन अंदाज जारी केला आहे. यामध्ये विजयादशमी अर्थातच दसऱ्याला राज्यातील हवामान कसे राहणार? या काळात महाराष्ट्रात पाऊस पडणार की नाही? नवरात्र उत्सवाच्या काळात राज्यातील हवामान कसे राहणार? या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.

ऑक्टोबर महिन्याच्या कोणकोणत्या तारखांना राज्यात पाऊस पडणार, एवढेच नाही तर यावर्षी थंडीला कधीपासून सुरुवात होणार याविषयी सुद्धा त्यांनी माहिती सांगितली आहे. यामुळे आता आपण पंजाबरावांचा हा नवीन अंदाज सविस्तर जाणून घेणार आहोत.

पंजाब डख यांचा अंदाज काय सांगतो ?

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात आणखी तीन दिवस हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. मात्र त्यानंतर राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे. 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाची शक्‍यता आहे.

या काळात राज्यातील काही भागांमध्ये अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याची शक्यता असून पुरस्थिती तयार होईल अशी भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे. 21 सप्टेंबर पासून महाराष्ट्रातील विदर्भा कडून पावसाला सुरुवात होणार आहे.

सर्वात आधी पूर्व विदर्भात मग पश्चिम विदर्भात, पुढे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र तसेच मध्य महाराष्ट्र आणि मग तो पाऊस कोकणात सक्रिय होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सप्टेंबर ची जशी पावसाने सुरुवात झाली होती तशीच सुरुवात ऑक्टोबर महिन्याची देखील होणार आहे. 1 अन दोन ऑक्टोबरला राज्यात चांगल्या मोठ्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ऑक्टोबरच्या कोणकोणत्या तारखांना पाऊस पडणार

एक आणि दोन ऑक्टोबरला महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता आहे. 7 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर दरम्यान म्हणजेच दसऱ्याच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. नवरात्र उत्सव आणि दसऱ्याच्या कालावधीत राज्यात पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

यासोबतच दिवाळीच्या आधी म्हणजेच 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नाही तर पंजाब रावांनी यंदा 5 नोव्हेंबर पासून थंडीला सुरुवात होणार असाही अंदाज दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe