Panjabrao Dakh Havaman Andaj : पंजाबरावांनी नुकताच एक हवामान अंदाज जारी केला होता. यात त्यांनी 15 नोव्हेंबर पासून 17 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. यानुसार काल 15 नोव्हेंबरला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने दणका दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे.
तसेच काही ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळाले आहे. यामुळे आज आणि उद्या अर्थात 16 आणि 17 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील कोणत्या भागांमध्ये पाऊस पडणार? याबाबत पंजाबरावांनी काय म्हटले आहे, याविषयी आता आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
पंजाबरावांचा हवामान अंदाज काय सांगतो?
पंजाब रावांनी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, आज आणि उद्या अर्थात 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी राज्यातील मध्य महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूरचा जत भाग आणि कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात पावसाची शक्यता आहे.
तसेच हे दोन दिवस गोव्यातही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. गोव्यातील पणजी येथे 16 आणि 17 नोव्हेंबरला पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाबरावांनी जाहीर केला आहे. मात्र 17 तारखेनंतर राज्यातील हवामान कलाटणी घेणार आहे.
18 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीला सुरुवात होणार आहे. येत्या तीन दिवसांनी राज्यात पुन्हा थंडीची लाट येईल हवामान कोरडे राहील असे पंजाबरावांचे म्हणणे आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे 18 तारखेनंतर देशातील मध्य प्रदेश राजस्थान गुजरात दिल्ली या भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवेल.
महाराष्ट्रात सुद्धा याचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्रातील किमान तापमान देखील कमी होणार आहे. राज्यातील किमान अन कमाल तापमानात मोठ्या प्रमाणात घट येणार आहे.
राज्यातील तापमान 12 ते 13 अंश सेल्सिअस वर येणार असेही पंजाबरावांनी यावेळी सांगितले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारतीय हवामान खात्याने देखील आज राज्यातील काही भागांमध्ये पाऊस पडणार असे म्हटले आहे.
हवामान खात्याने आपल्या नवीन अंदाजात आज राज्यातील कोकण विभागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील सातारा, कोल्हापूर, मराठवाडा विभागातील धाराशिव, लातूर या 6 जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्र विभागातील अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, मराठवाडा विभागातील बीड, हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मात्र या जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून कोणताच अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. अर्थातच या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाच्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.