Panjabrao Dakh Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा खराब होणार आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज समोर आला आहे.
पंजाबरावांनी महाराष्ट्रात 21 डिसेंबर पासून पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात 21 डिसेंबर ते 25 डिसेंबर पर्यंत भाग बदलत अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज लक्षात घेऊन 20 तारखेपर्यंत आपल्या शेतीची कामे पूर्ण करून घ्यावीत विशेषता ज्या शेतकऱ्यांची कांदा काढणी बाकी असेल त्यांनी वीस तारखेपर्यंत कांदा काढणी करून घ्यावी असे आवाहन यावेळी पंजाबराव यांनी केले आहे.
पंजाब रावांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान मुंबई पुणे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा सहित राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस पडणार आहे. या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
सर्वत्र पडणार नाही पण भाग बदलत जोरदार पाऊस पडणार असा अंदाज पंजाबराव यांनी दिला आहे. तथापि 19 डिसेंबर पर्यंत राज्यात थंडीची लाट राहणार आहे. म्हणजेच आजपासून पुढील सहा ते सात दिवस राज्यात चांगली कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे.
पण वीस तारखे नंतर राज्यातील हवामान चेंज होईल. 20 तारखेला राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळणार आहे. यानंतर एक 21 डिसेंबर रोजी राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार अशी शक्यता आहे.
21 तारखेला अवकाळी पाऊस सुरू झाला की थेट 26 पर्यंत राज्यात अवकाळी पाऊस सुरू राहणार असा अंदाज आहे. त्यामुळे या काळात राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी असा सल्ला यावेळी जाणकार लोकांनी दिला आहे.
एवढेच नाही तर 17 ते 19 डिसेंबर दरम्यान तिरुपतीकडे ही मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जे लोक तिरुपतीला दर्शनासाठी जाणार असतील त्यांनीही या काळात विशेष सावध राहावे असा सल्ला यावेळी पंजाब रावांनी दिला आहे.
शक्यतो या काळात तिरुपती दर्शनाला जाण्याचा प्लॅन करूच नये पण जर प्लॅन झाला असेल तर पावसाचा अंदाज घेऊन आपली काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी पंजाबराव यांनी केले आहे.