Panjabrao Dakh Navin Havaman Andaj : ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन हवामान अंदाज दिला आहे. या नवीन हवामान अंदाजानुसार महाराष्ट्रात आजपासून पुढील तीन दिवस म्हणजे 7 ऑक्टोबर पर्यंत काही भागात भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हवामान अंदाजानुसार आपल्या शेतीकामांचे नियोजन आखावे असा सल्ला देण्यात आला आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार, आज पासून पुढील तीन दिवस म्हणजेच पाच, सहा आणि सात ऑक्टोबरला राज्यातील काही भागांमध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा म्हणजेच भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा पाऊस रात्रीच्या वेळी पडणार आहे.

हे तीन दिवस राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजी नगर, परभणी, जालना, जळगाव, वाशिम, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशिव, सातारा, सोलापूर, सांगली, कोकण किनारपट्टी, कोल्हापूर, अहमदनगर, पुणे, संगमनेर, श्रीरामपूर, शेवगाव पाथर्डी या भागात भाग बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.
हे तीन दिवस राज्यातील विदर्भ विभागात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. म्हणजेच कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हे तीन दिवस भाग बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि उर्वरित राज्यात म्हणजेच विदर्भात पावसाचे प्रमाण हे इतर भागांपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
या तीन दिवसांच्या काळात विदर्भ विभागातील भंडारा, गोंदिया, बुलढाणा, नागपूर, वर्धा, अकोला, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहील असा अंदाज पंजाबरावांनी वर्तवला आहे.
एवढेच नाही तर पंजाबरावांनी पाच नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीला सुरुवात होणार असेही भाकित यावेळी वर्तवले आहे. सध्या राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये सुगीचे दिवस सुरू आहेत.
काही ठिकाणी खरीप हंगामातील पिकांची काढणी पूर्ण झाली आहे तर काही ठिकाणी काढणीची कामे सुरू आहेत. अशा परिस्थितीत जर पाऊस झाला तर शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाची शक्यता लक्षात घेऊन काढणी केलेला शेतमाल लवकरात लवकर सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा असे आवाहन जाणकारांच्या माध्यमातून केले जात आहे.
दुसरीकडे पंजाब रावांप्रमाणेच भारतीय हवामान खात्याने देखील राज्यात पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केलेला आहे.