Panjabrao Dakh News : पंजाबरावांचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरंतर, ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीसोबतच रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात रब्बी हंगामातील काही पिकांची पेरणी केली जाते. जिरायती हरभऱ्याची पेरणी ही ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात होत असते.
त्यानुसार राज्यातील अनेक भागांमध्ये जिरायती हरभऱ्याची पेरणी करण्यात आली आहे. दरम्यान येत्या काही दिवसांनी महाराष्ट्रात बागायती हरभऱ्याची देखील पेरणी सुरू होणार आहे. यासोबतच गहू, मोहरी, मसुरसारख्या विविध रब्बी हंगामातील पिकांची पेरणी लवकरच सुरू होणार आहे.

अशातच आता पंजाबरावांनी महाराष्ट्रातील मान्सून संदर्भात मोठे अपडेट दिली आहे. खरे तर हवामान खात्याने मान्सून महाराष्ट्रासहित संपूर्ण देशातून माघारी फिरला असल्याचे जाहीर केले आहे. मात्र पंजाबरावांनी अजून महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरला नसल्याचे म्हटले आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज आणि उद्या नांदेड, लातूर, परभणी, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, संभाजीनगर, जालना या भागात भाग बदलत तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र 19 ऑक्टोबर पासून राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे.
19 ऑक्टोबर पासून पुढील तीन दिवस म्हणजेच 21 ऑक्टोबर पर्यंत राज्यातील यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकण, नाशिक या भागात भाग बदलत जोराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
मात्र हे तीन दिवस खानदेशातील नंदुरबार आणि धुळे या जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. तसेच 22 ऑक्टोबरला राज्यातील उत्तर महाराष्ट्रातून मान्सून निघून जाणार आहे.
23 ऑक्टोबरला राज्यातील मराठवाडा विभागातील मान्सून माघारी फिरणार आहे. शिवाय 24 ऑक्टोबर पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार असा दावा पंजाबरावांनी यावेळी केला आहे.
महत्त्वाचे म्हणजे यावर्षी महाराष्ट्रात पाच नोव्हेंबर पासून थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून आधीच वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंजाबरावांचा हा हवामान अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेतीकामांचे नियोजन आखावे असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे.