Panjabrao Dakh News : पंजाबरावांनी उद्यापासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज दिला आहे. उद्या 21 डिसेंबर रोजी राज्यातील विदर्भा कडून पावसाला सुरुवात होणार आहे. 21, 22 आणि 23 डिसेंबर पर्यंत विदर्भ विभागातच पाऊस पडणार असा अंदाज आहे. हे तीन दिवस राज्यातील यवतमाळ चंद्रपूर वर्धा गडचिरोली छत्तीसगड नागपूरकडे पाऊस पडणार आहे.
विदर्भ आणि नागपूरकडे जवळपास 24 तारखेपर्यंत पाऊस राहील. 24 तारखेला वातावरणात थोडासा बदल होणार आहे आणि त्यानंतर मात्र राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे 25 तारखेपासून राज्यातील मराठवाडा सहित पश्चिम महाराष्ट्राकडे पाऊस पडणार आहे.
25 पासून मराठवाड्याकडून पश्चिम महाराष्ट्राकडे पावसाची व्याप्ती वाढणार आहे. मराठवाडा जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती अकोला वर्धा बुलढाणा परभणी अहिल्यानगर बीड धाराशिव लातूर जत या भागात 25 तारखेपासून पावसाला सुरुवात होणार असे पंजाब रावांनी यावेळी म्हटले आहे.
- राज्यात जवळपास 26 ते 27 तारखेपर्यंत पाऊस पडणार आहे. 21 तारखेपासून ते 26 तारखेपर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस पडेल असे पंजाबरावांनी यावेळी स्पष्ट केले आहे. म्हणजेच या काळात राज्यात सर्व दूर पाऊस पडणार नाही तर भाग बदलत पाऊस पडणार आहे.
यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे असा सल्ला यावेळी देण्यात आला आहे. दुसरीकडे पुणे वेधशाळेने देखील महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिलेला आहे.
पुणे वेधशाळेने म्हटल्याप्रमाणे राज्यात 20 डिसेंबर रोजी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, कोल्हापूर जिल्ह्याचा घाटमाथा परिसर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणातील या संबंधीत जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची विशेष काळजी घ्यावी, प्रामुख्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकारांनी केलेले आहे.