पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज : ‘या’ तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रात पाऊस पडणार, डिसेंबर महिन्यात हवामान कसे राहील ?

पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असे म्हटले आहे. पंजाबरावांच्या नव्या हवामान अंदाजानुसार, आगामी आठ दिवस म्हणजेच 29 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील. मात्र 29 तारखे नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये 30 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज डख यांनी यावेळी जारी केला आहे.

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. खरे तर, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा थंडीची लाट येत आहे. राज्यातील उत्तर महाराष्ट्रासह अनेक भागांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली असून आता सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहेत.

राज्यातील काही भागांमध्ये दिवसाचे कमाल आणि रात्रीचे किमान तापमान मोठ्या प्रमाणात घटले असून याचा परिणाम म्हणून थंडीची तीव्रता वाढली आहे. थंडीची तीव्रता वाढली असल्याने रब्बी हंगामातील पिकांना सुद्धा याचा फायदा होईल अशी आशा देखील शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

मात्र असे असतानाच पंजाबरावांनी एक नवीन अंदाज दिला आहे. पंजाबराव डख यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असे म्हटले आहे. पंजाबरावांच्या नव्या हवामान अंदाजानुसार, आगामी आठ दिवस म्हणजेच 29 नोव्हेंबर पर्यंत राज्यातील हवामान कोरडे राहील.

मात्र 29 तारखे नंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागांमध्ये 30 नोव्हेंबर पासून पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल असा अंदाज डख यांनी यावेळी जारी केला आहे.

पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालच्या खाडीत 29 नोव्हेंबरच्या दरम्यान चक्रीवादळ तयार होत आहे आणि याच चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर 29 आणि 30 तारखेला तामिळनाडूला मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस पुढे आंध्र प्रदेश मध्ये जाईल आणि आंध्रप्रदेश कडून हा पाऊस आपल्या महाराष्ट्राकडे येणार आहे.

बंगालच्या खाडी तयार झालेल्या या चक्रीवादळामुळे राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असून एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंजाबराव सांगतात की, दरवर्षी महाराष्ट्रात दोन ते सात डिसेंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस होत असतो. यंदाही अशीच परिस्थिती पाहायला मिळणार असून एक डिसेंबर ते चार डिसेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

त्यामुळे आता पंजाब रावांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे. खरे तर आता कुठे थंडीला सुरुवात झाली होती. गेली अनेक दिवस थंडीची तीव्रता कमी असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढत होती. रब्बी हंगामातील गहू हरभरा सारख्या पिकांना थंडीची नितांत आवश्यकता असते.

पण यावर्षी थंडीला उशीर आणि सुरुवात झाली आणि 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यान राज्यात ठिकठिकाणी पाऊस झाला यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले. पण 18 नोव्हेंबर पासून राज्यात कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. मात्र 1 डिसेंबर पासून पुन्हा एकदा राज्यात पाऊस सुरू होईल असा अंदाज दिला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe