पंजाबरावांचा नवीन हवामान अंदाज आला रे…..; महाराष्ट्रात आणखी इतके दिवस मुसळधार पाऊस पडणार, ‘या’ तारखेपासून मान्सून रजेवर जाणार

पंजाब रावांनी जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात आज आणि उद्या महाराष्ट्रातील बहुतांशी भागात विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र आज आणि उद्या राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, शिर्डी, कोपरगाव, राहुरी, गंगापूर, मुंबई या भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे.

Published on -

Panjabrao Dakh News : पंजाब रावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. महाराष्ट्रात पंजाब रावांच्या हवामान अंदाजावर विश्वास ठेवणारा एक मोठा वर्ग आहे. राज्यातील शेतकरी बांधव पंजाब रावांच्या हवामान अंदाजावर अधिक विश्वास ठेवतात. दरम्यान, जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी एक नवीन अंदाज जारी केला आहे.

पंजाब रावांनी जारी केलेल्या आपल्या नवीन हवामान अंदाजात आज आणि उद्या महाराष्ट्रातील बहुतांशी भागात विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. मात्र आज आणि उद्या राज्यातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, शिर्डी, कोपरगाव, राहुरी, गंगापूर, मुंबई या भागात मोठ्या पावसाची शक्यता आहे.

हे दोन दिवस या भागात मुसळधार पाऊस होणार असे पंजाबरावांनी आपल्या बुलेटीनमध्ये स्पष्ट केले आहे. उर्वरित राज्यात म्हणजेच पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि दक्षिण महाराष्ट्रात मात्र विखुरलेल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

म्हणजेच या भागात पावसाचे प्रमाण कमी राहणार आणि सर्व दूर पाऊस पडणार नाही असे पंजाबरावांनी म्हटले आहे. दरम्यान राज्यातील पावसाचा जोर 29 तारखेपासून कमी होणार आहे. 29 सप्टेंबर पासून पुढील काही दिवस पाऊस रजेवर जाणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.

यामुळे सोयाबीन सारख्या पिकांची हार्वेस्टिंग करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खरीप हंगामातील पिकांची हार्वेस्टिंग सुरू असून गेल्या चार-पाच दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र आता पाऊस लवकरच विश्रांती घेणार आहे.

आज आणि उद्या राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी हलका पाऊस पडणार आहे. तदनंतर मात्र म्हणजेच 29 सप्टेंबर पासून पाऊस सुट्टीवर जाणार असे दिसत आहे. मात्र ऑक्टोबरच्या सुरुवातीला पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.

2 ऑक्टोबर पासून म्हणजेच गांधी जयंती पासून पुन्हा एकदा राज्यात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 2 ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबर दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे.

परंतु विदर्भ आणि मराठवाडा विभागातील जिल्ह्यांमध्ये म्हणजेच राज्यातील जवळपास 19 जिल्ह्यांमध्ये त्या काळातही हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच पंजाबरावांनी पुढील महिन्यात मान्सून महाराष्ट्रातून माघार घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ऑक्टोबर महिन्यात मान्सून महाराष्ट्रातून परतणार आहे. म्हणजेच लवकरच आता राज्यात थंडीला सुरुवात होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!