Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. पंजाबरावं डख यांचा एक नवीन अंदाज समोर आला आहे. पंजाबरावांनी राज्यात थंडीची तीव्रता कधीपासून वाढणार, आगामी काही दिवस महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार, पाऊस पडणार की हवामान कोरडे राहणार, यासंदर्भात एक नवीन अंदाज जारी केला आहे.
खरंतर नोव्हेंबर महिना सुरू होऊन जवळपास चार-पाच दिवसांचा काळ उलटला आहे. दिवाळीचा सण देखील साजरा झाला आहे. दरवर्षी दीपोत्सवाच्या काळात राज्यात थंडीची चाहूल लागत असते.

यंदा मात्र दीपोत्सवाचा सण उलटल्यानंतरही राज्यात थंडीची चाहूल लागलेली नाही. याउलट दीपोत्सवाच्या काळात राज्यातील अनेक भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले आणि काही ठिकाणी कमाल तापमान देखील वाढले होते.
तसेच राज्यातील काही भागांमध्ये दीपोत्सवाच्या काळात जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. यामुळे आता राज्यात थंडीला कधीपासून सुरुवात होणार हा मोठा सवाल आहे.
दरम्यान पंजाब रावांनी राज्यात आज आणि उद्या सर्व दूर अंशतः ढगाळ वातावरण राहणार असे म्हटले आहे. तथापि राज्यातील पावसाळी वातावरण आता निवळले आहे.
महाराष्ट्रात आता पाऊस पडणार नाही. राज्यात आता हवामान कोरडे राहणार फक्त काही भागांमध्ये अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळणार असा अंदाज पंजाबरावांनी दिला आहे.
आज आणि उद्या राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अंशतः ढगाळ हवामान राहील. पाऊस पडणार नाही. यामुळे शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे काहीही कारण नाही.
सध्याचे हवामान रब्बी हंगामातील गहू हरभरा सारख्या सर्वच पिकांच्या पेरणीसाठी अनुकूल आहे. यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर रब्बी हंगामातील पिकांची पेरणी पूर्ण करून घ्यावी, असा सल्ला जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांनी दिला आहे.
परंतु ढगाळ वातावरणामुळे शेती पिकांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता देखील नाकारून चालणार नाही. दरम्यान राज्यात पाच नोव्हेंबर नंतर थंडीसाठी अनुकूल परिस्थिती तयार होणार आहे.
पाच नोव्हेंबर नंतर अर्थातच ६ नोव्हेंबर पासून राज्यात थंडीची तीव्रता वाढण्याची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे. एकंदरीत महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांनी थंडीची तीव्रता वाढणार आहे.
थंडीची तीव्रता वाढल्यानंतर रब्बी हंगामातील पिकांच्या वाढीस पोषक परिस्थिती तयार होणार आहे. थंडी वाढली की राज्यातील फळ पिकांना देखील मोठा फायदा होणार आहे.