पंजाबराव डख : ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा पाऊस सुरु होणार, दिवाळीच्या काळात राज्यातील या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार !

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची विश्रांती होती, मात्र आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचे सत्र सुरू होणार आहेत. ऐन दीपोत्सवाच्या काळातच राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, पंजाब रावांनी देखील दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे.

Published on -

Panjabrao Dakh News : भारतीय हवामान खात्याने आजपासून पुढील तीन दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आज आणि उद्या राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच 31 ऑक्टोबरला राज्यातील विदर्भ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाची विश्रांती होती, मात्र आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचे सत्र सुरू होणार आहेत. ऐन दीपोत्सवाच्या काळातच राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

दरम्यान, पंजाब रावांनी देखील दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात पाऊस पडणार असा अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आणखी दोन दिवस महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

29 आणि 30 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील हवामान कोरडे राहील मात्र तदनंतर राज्यातील हवामानात पुन्हा मोठा बदल पाहायला मिळणार आहे आणि पावसाचे सत्र सुरू होण्याची शक्यता आहे.

पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 31 ऑक्टोबर पासून पावसाला सुरुवात होईल आणि तीन नोव्हेंबर पर्यंत पाऊस सुरू राहणार आहे. अर्थातच नोव्हेंबर महिन्याची सुरुवात पावसानेच होणार आहे.

या कालावधीत राज्यातील यवतमाळ, अमरावती, वाशिम, नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, बीड, जालना, बुलढाणा या भागात पावसाची शक्यता आहे.

मात्र या चार दिवसांच्या काळात उत्तर महाराष्ट्र विभागात केवळ ढगाळ हवामान राहणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक या जिल्ह्यात फक्त ढगाळ हवामान राहणार आहे. महत्त्वाचे म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील काही भागात आता थंडीला सुरुवात होणार आहे.

तसेच संपूर्ण महाराष्ट्रात 5 नोव्हेंबर पासून थंडीची तीव्रता वाढणार असा अंदाज पंजाब रावांनी दिला आहे. 31 ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे मात्र हा पाऊस सर्व दूर पडणार नाही. भाग बदलत पावसाची शक्यता असून पावसाचे प्रमाणही कमी राहणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी अधिक काळजी करण्याचे काहीही कारण नाही परंतु पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊनच आपल्या शेतीकामांची नियोजन आखावे. जेणेकरून त्यांना कोणत्याही नुकसानीचा सामना करावा लागणार नाही असा सल्ला जाणकार लोकांनी यावेळी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe