Panjabrao Dakh News : महाराष्ट्रासह सध्या संपूर्ण देशात रब्बी हंगामाला सुरुवात झाली आहे. रब्बी हंगामातील गहू आणि हरभरा या मुख्य पिकांची पेरणी सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी गव्हाची आणि हरभऱ्याची पेरणी पूर्ण देखील झाली आहे. तर काही ठिकाणी मजुरांअभावी शेतकरी बांधव आपल्या परिवारासमवेत रब्बी पिकांच्या पेरणीसाठी मेहनत घेताना दिसत आहेत.
अशातच ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. खरे तर भारतीय हवामान खात्याने काल एक नवीन अंदाज जारी केला आहे. यामध्ये हवामान खात्याने दिवाळीच्या काळात महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असे म्हटले आहे.

उद्यापासून अर्थातच 29 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार असे आयएमडीने आपल्या नवीन बुलेटिन मध्ये जाहीर केले आहे. 29 आणि 30 ऑक्टोबरला राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असा अंदाज असून 31 ऑक्टोबरला देखील राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उद्या 28 ऑक्टोबरला तसेच 30 तारखेला राज्यातील कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 31 तारखेला मात्र राज्यातील उर्वरित भागांमधून पावसाचा जोर कमी होईल तथापि विदर्भात पावसाची शक्यता कायम राहणार आहे.
विदर्भातील पूर्वेकडील जिल्ह्यामध्ये या दिवशी पाऊस पडणार असा अंदाज आयएमडीने दिला आहे. पंजाब रावांनी देखील राज्यात दिवाळीच्या काळात पाऊस पडणार असे म्हटले आहे. आता आपण पंजाबरावांचा हवामान अंदाज समजून घेऊयात.
पंजाबरावांचा हवामान अंदाज काय सांगतो?
पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात 30 ऑक्टोबर पासून पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. 30 आणि 31 ऑक्टोबरला तसेच एक, दोन आणि तीन नोव्हेंबरला महाराष्ट्रात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
म्हणजेच 30 ऑक्टोबर ते तीन नोव्हेंबर दरम्यान राज्यात पावसाची शक्यता आहे. दीपोत्सवाच्या काळात यंदा पाऊस हजेरी लावणार असा अंदाज त्यांनी दिला आहे. पंजाब रावांनी म्हटल्याप्रमाणे राज्यात दिवाळीमध्ये पाऊस पडेल मात्र सर्व दूर राहणार नाही.
भाग बदलत पाऊस पडणार आहे आणि फार मोठा पाऊस राहणार नाही फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस राहील. पंजाबरावांच्या मते राज्यातील काही भागांमध्ये 28 तारखेपासूनच पाऊस सुरू होईल. म्हणजेच आज पासूनच पावसाला सुरुवात होणार आहे.
आज यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी या भागात पाऊस येईल. उद्या म्हणजेच 29 ऑक्टोबरला बीड, लातूर, धाराशिवपर्यंत पावसाची व्याप्ती वाढेल. त्यानंतर तीस तारखेला अहिल्यानगर, सातारा, सांगलीपर्यंत पाऊस पोहोचणार आहे.
पुढे 31 ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातील नाशिक पर्यंत आणि कोकण, पुण्याकडे पाऊस पोहोचणार आहे. मग, एक नोव्हेंबरला राज्यातील कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.