Panjabrao Dakh News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे.
मंडळी डिसेंबर 2024 मध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले होते. जानेवारीत सुद्धा राज्यात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली होती.
मात्र जानेवारी महिन्यात राज्यात कुठेच फार मोठा अवकाळी पाऊस झाला नाही आणि यामुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान झाले नाही. फक्त काही भागांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळाले आणि यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे थोडे फार नुकसान झाले.
पण, आता फेब्रुवारी महिन्यात राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे.
काय म्हणतात पंजाबराव?
पंजाब रावांनी वर्तवलेल्या नवीन सुधारित हवामान अंदाजानुसार, फेब्रुवारीच्या सुरुवातीला महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. एक फेब्रुवारी नंतर राज्यातील हवामान बिघडणार आणि त्यानंतर अवकाळीला सुरुवात होणार असे पंजाबरावांचे म्हणणे आहे.
2 फेब्रुवारीपासून राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज पंजाब रावांनी दिला असून यामुळे शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारीपर्यंत आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत. 2 फेब्रुवारी पासून ते 4 फेब्रुवारी पर्यंत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे.
या काळात राज्यात अवकाळी पाऊस होणार असल्याने शेतकऱ्यांनी एक फेब्रुवारीपर्यंत हरभरा काढणी सारखी महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत. येत्या आठ दिवसानंतर म्हणजेच 2 फेब्रुवारी नंतर पुढील तीन-चार दिवस अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती राहणार आहे. दोन, तीन आणि 4 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज आहे.
यामुळे ज्या शेतकरी बांधवांची तूर काढणी बाकी असेल त्यांनी तूर काढणी करून घ्यावी, ज्यांचा कांदा काढणी बाकी असेल त्यांनी कांदा काढणी करून घ्यावी, तसेच ज्यांचा हरभरा काढणी शिल्लक असेल त्यांनी देखील हरभरा काढणीची कामे पूर्ण करून घ्यावीत असा सल्ला पंजाबराव यांनी यावेळी दिलाय.
खरंतर डिसेंबर महिन्यात राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस झाला होता अन जानेवारी महिन्यातही राज्यात पावसाळी वातावरण तयार झाले होते पण जानेवारीमध्ये राज्यात फार मोठा पाऊस झाला नाही, मात्र आता फेब्रुवारी महिन्यात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घेऊन आपल्या शेतीच्या कामांचे नियोजन करावे असा सल्ला जाणकार लोकांनी दिला आहे.