पंजाबरावांचा नवा हवामान अंदाज : ऐन हिवाळ्यात जोराचा पाऊस ; ‘या’ तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा अवकाळी पाऊस पडणार !

एकीकडे पुणे वेधशाळेचा हा हवामान अंदाज समोर आला आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी राज्यात येत्या चार दिवसांनी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे. पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे.

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : पुणे वेधशाळेने नुकताच एक नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. राज्यात लवकरच अवकाळी पावसाला सुरुवात होणार असे वेधशाळेने स्पष्ट केले आहे. वेधशाळेने सांगितल्याप्रमाणे येत्या दोन दिवसांनी अर्थातच 19 तारखेपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार आहे.

19 आणि 20 तारखेला राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे दोन दिवस राज्यातील कोकणातील सिंधुदुर्ग आणि मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर तसेच कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथा परिसरावर हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज आहे.

तसेच 20 तारखेला सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. पुणे जिल्ह्याबाबत बोलायचं झालं तर पुण्यात 19 आणि 20 तारखेला ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते मात्र इथे पावसाची शक्यता नाही.

एकीकडे पुणे वेधशाळेचा हा हवामान अंदाज समोर आला आहे तर दुसरीकडे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी देखील महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाब रावांनी राज्यात येत्या चार दिवसांनी पावसाला सुरुवात होणार असा अंदाज दिला आहे.

पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान आता आपण या कालावधीत राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो या संदर्भात माहिती पाहणार आहोत.

पंजाबरावांचा सविस्तर हवामान अंदाज

पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार, 21 डिसेंबर पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होणार आहे. 21 ते 26 तारखे दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल असा अंदाज त्यांनी यावेळी दिला आहे.

यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, पुसद, अमरावती, वर्धा, वाशिम, बुलढाणा, अकोला, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, कोकण किनारपट्टी, मुंबई, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, वैजापूर, गंगापूर, शिर्डी,संगमनेर, दौंड, नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

19 तारखेपर्यंत महाराष्ट्रात कडाक्याची थंडी राहील मात्र त्यानंतर राज्यातील हवामान बिघडणार आहे. वीस तारखेला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते आणि 21 पासून महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असे पंजाब रावांनी आपल्या या नवीन बुलेटिन मध्ये स्पष्ट केले आहे.

एकंदरीत पुणे वेधशाळेने आणि पंजाब रावांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची शक्यता वर्तवली असल्याने शेतकऱ्यांनी विशेष सावध राहण्याची आवश्यकता आहे. विशेषता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी अधिक दक्ष राहून आपल्या पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe