नववर्षाच्या स्वागतासाठी पावसाची हजेरी राहणार ? जानेवारी महिन्यात कस राहणार हवामान ? पंजाबरावांनी दिली मोठी माहिती

आज राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस सुद्धा झालाय. अशातच आता पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतालाही राज्यात पाऊस येणार का जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार यासंदर्भात पंजाब रावांनी मोठी माहिती दिली आहे.

Tejas B Shelar
Published:
Panjabrao Dakh News

Panjabrao Dakh News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील हवामानात सातत्याने बदल होत आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढ झाली आहे. राज्याचे किमान आणि कमाल तापमान वाढले असून यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली आहे. कडाक्याची थंडी बऱ्याच प्रमाणात ओसरली असून राज्यात सर्वदूर ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे.

काल तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने दणका दिला. परभणी, नाशिक, जळगाव, धुळे, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर सहित राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये काल पावसाची नोंद करण्यात आली. आज देखील राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाळी वातावरणाची अनुभूती येत आहे.

आज राज्यातील बहुतांशी भागांमध्ये ढगाळ हवामान असून काही ठिकाणी किरकोळ स्वरूपाचा पाऊस सुद्धा झालाय. अशातच आता पंजाबरावांचा एक नवीन हवामान अंदाज समोर येत आहे. नवीन वर्षाच्या स्वागतालाही राज्यात पाऊस येणार का जानेवारी महिन्यात महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार यासंदर्भात पंजाब रावांनी मोठी माहिती दिली आहे.

पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे आज राज्यातील बहुतांशी भागांमध्ये पावसाची शक्यता आहे. उद्या सुद्धा राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे. पण तीस तारखेपासून महाराष्ट्रातील हवामान पुन्हा एकदा पूर्व पदावर येईल. 30 डिसेंबर पासून महाराष्ट्रातील हवामान कोरडे होणार असून थंडीची तीव्रता वाढणार आहे.

30 आणि 31 डिसेंबरला राज्यात कडाक्याची थंडी पडू शकते. एक जानेवारीपासून महाराष्ट्रात कुठेच पाऊस पडणार नाही. 30 डिसेंबर पासून जवळपास 15 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रात प्रामुख्याने हवामान कोरडे राहण्याची शक्यता पंजाबरावांच्या माध्यमातून वर्तवण्यात आली आहे.

म्हणजेच नवीन वर्षाचे स्वागत कडाक्याच्या थंडीने होणार असा अंदाज पंजाबरावांनी यावेळी दिला आहे. भारतीय हवामान खात्याने देखील आज राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. आय एम डी ने आज राज्यातील 11 जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे.

या अनुषंगाने या संबंधित जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात आज पावसासाठी पोषक परिस्थिती आहे असा अंदाज आयएमडीने दिला असून या अनुषंगाने या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेती पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन कृषी क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात आले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe