थंडीचा कहर सुरू होताच महाराष्ट्रातील हवामानात गडबड! ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरुवात होणार; पंजाबराव डख

Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडाक्याच्या थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीची तीव्रता उत्तर महाराष्ट्रासहित राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वाढली आहे.

यंदा दिवाळीच्या काळात पाऊस सुरू होता यामुळे थंडीचे उशिराने आगमन झाले. 15 ते 17 नोव्हेंबर दरम्यानही महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामान आणि पाऊस झाला होता. यामुळे देखील मध्यंतरी थंडीचा जोर कमी झाला होता.

पण आता गेल्या तीन-चार दिवसांपासून थंडीची लाट आली आहे. अशातच आता पंजाबरावांनी एक नवा अंदाज जारी केला आहे. थंडीचा कहर सुरू होताच महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा गडबड झाली असून राज्यात पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पंजाबरावांनी आपल्या नवीन हवामान अंदाजात याबाबत माहिती दिली आहे. पंजाबराव डख यांनी सांगितल्याप्रमाणे, राज्यात एक डिसेंबरपासून ढगाळ हवामान पाहायला मिळू शकते. तसेच दोन डिसेंबर नंतर राज्यातील काही भागांमध्ये पाऊस सुरू होऊ शकतो.

आज पासून पुढील तीन दिवस म्हणजेच 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान तिरुपतीकडे मोक्कार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तिकडे मुसळधार पाऊस पडणार असल्याने याचा परिणाम आपल्या महाराष्ट्रावर देखील होणार असा अंदाज आहे.

तिरुपती कडे जोरदार पाऊस पडणार असल्याने जे लोक तिरुपती दर्शनासाठी जाणार असतील त्यांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन पंजाबरावांनी केले आहे.

सोबतच तिरुपती कडे मुसळधार पाऊस होणार असल्याने याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर देखील पडेल आणि दोन ते चार डिसेंबर दरम्यान राज्यातील नांदेड अहमदपूर उदगीर आंबेजोगाई परळी लातूर केज धाराशिव पंढरपूर या भागात तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

महत्त्वाची बाब अशी की चार तारखेनंतर महाराष्ट्रातील अवकाळी पावसाची तीव्रता आणि व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. चार ते आठ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तथापि या काळातही राज्यात सर्वदूर पाऊस पडणार नाही परंतु मध्य महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सावंतवाडी राधानगरी पुणे जग पंढरपूर लातूर बीड संगमनेर कोकण जळगाव संभाजीनगर वैजापूर गंगापूर शिर्डी अहमदनगर धाराशिव या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

यामुळे या संबंधित भागातील शेतकऱ्यांनी आणि सर्वसामान्य नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.