Panjabrao Dakh : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. परभणीचे ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी नुकताच एक हवामान अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी राज्यात पुढील काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याची शक्यता असली तरी देखील त्यानंतर महाराष्ट्रात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत असल्याचा अंदाज दिला आहे.
पंजाब रावांनी सांगितल्याप्रमाणे राज्यात पुढील चार ते पाच दिवस म्हणजेच 30 मार्च पर्यंत हवामान प्रामुख्याने कोरडे राहणार आहे. राज्यात जवळपास गुढीपाडव्यापर्यंत हवामान कोरडे राहिला आणि त्यानंतर महाराष्ट्रात पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.

30 ते 31 मार्चपर्यंत राज्यात तापमानात सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसणार आहे. यामुळे या काळात शेतीची सर्व महत्त्वाची कामे पूर्ण करून घ्यावीत कारण की एक एप्रिल पासून राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू होण्याची दाट शक्यता आहे.
एप्रिल महिन्याची सुरुवात अवकाळी पावसाने
पंजाबरावांनी वर्तवलेल्या आपल्या सुधारित हवामान अंदाजानुसार एक एप्रिल पासून महाराष्ट्रात अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. खरे तर सध्या सर्वत्र मान्सून बाबत चर्चा रंगल्या आहेत. यंदाचा मान्सून कसा राहणार असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित होतोय.
अनेक जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांनी यावर्षी मान्सून काळात महाराष्ट्रात तसेच भारतात चांगला पाऊस होणार असा अंदाज दिला आहे. यंदा राज्यात सरासरीपेक्षा जास्त किंवा सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज आहे.
नक्कीच हवामान अंदाज वर्तवणाऱ्या या जागतिक संस्थांचा अंदाज खरा ठरला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. जागतिक हवामान अंदाज वर्तवणाऱ्या संस्थांचा अंदाज राज्यातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच दिलासादायी आहे.
परंतु मान्सून कसा असेल हे भारतीय हवामान खात्याच्या मान्सून 2025 च्या पहिल्या अंदाजानंतरच क्लियर होणार आहे. भारतीय हवामान विभाग एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मान्सून 2025 चा पहिला अंदाज जारी करण्याची शक्यता आहे.
त्यामुळे भारतीय हवामान खाते यंदाच्या मान्सून बाबत काय सांगणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. असे असतानाच आता एक एप्रिल ते पाच एप्रिल दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पंजाब रावांनी दिलेल्या माहितीनुसार एक, दोन, तीन आणि चार आणि पाच एप्रिल रोजी महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा विभागात अवकाळी पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होत आहे.
यामुळे गहू कांदा हरभरा हळद ज्वारी पिकांची काढणी करायची असेल तर शेतकऱ्यांनी 31 मार्चपर्यंत आपल्या शेती पिकांची काढणी पूर्ण करून घ्यावी असा सल्ला पंजाबरावांच्या माध्यमातून यावेळी देण्यात आला आहे.
या काळात कोकणासहित मुंबईतही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. गुढीपाडव्यानंतर राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे. पण आता पंजाबरावांचा हा हवामान अंदाज खरा ठरतो का हे पाहणे उत्सुकतेचे राहणार आहे.