‘या’ 23 रुपयांच्या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल ! 5 दिवसांत मिळाला 65 % परतावा

अवघ्या 23 रुपयांच्या एका पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच दिवसांमध्ये जोरदार परतावा दिला आहे. पल्सर इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकने ही किमया साधली आहे. आज बुधवारी 5 फेब्रुवारी 2025 रोजी या स्टॉकमध्ये रॉकेटसारखी तेजी दिसून आली.

Tejas B Shelar
Published:

Penny Stock : शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या शेकडो कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. यातील बहुतांशी कंपन्यांनी लॉन्ग टर्म मध्ये आपल्या गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. पण आज आपण अशा एका कंपनीची माहिती जाणून घेणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना अवघ्या पाच दिवसात मालामाल केले आहे.

अवघ्या 23 रुपयांच्या एका पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच दिवसांमध्ये जोरदार परतावा दिला आहे. पल्सर इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीच्या पेनी स्टॉकने ही किमया साधली आहे. आज बुधवारी 5 फेब्रुवारी 2025 रोजी या स्टॉकमध्ये रॉकेटसारखी तेजी दिसून आली.

हा शेअर आज ९ टक्क्यांहून अधिक वाढीसह २३ रुपयांवर पोहोचला आहे. म्हणून आज कंपनीच्या शेअर्सला ५२ आठवड्यांचा उच्चांक सुद्धा नोंदवता आलाय अन यामुळे या स्टॉक मध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण आहे.

गेल्या पाच वर्षांचा विचार केला असता या कंपनीचे स्टॉक 11 रुपयांवरून थेट 23 रुपयांवर पोहोचले आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना या पाच वर्षांच्या काळात या स्टॉक मधून जबरदस्त नफा कमवता आला आहे.

दरम्यान आज आपण शेअर मार्केटमध्ये सूचीबद्ध असणाऱ्या या कंपनीच्या स्टॉकची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. गेल्या पाच वर्षांमध्ये या स्टॉक ने आपल्या गुंतवणूकदारांना कशा पद्धतीने परतावा दिला याचीच माहिती आज आपण पाहणार आहोत.

5 वर्षांमधील कामगिरी कशी राहिली?

शेअर बाजारात लिस्टेड असणाऱ्या या कंपनीची गेल्या पाच वर्षांमधील कामगिरी फारच समाधानकारक आहे. गेल्या पाच वर्षांत हा स्टॉक २० हजार टक्क्यांहून अधिक वाढलाय म्हणजे या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या पाच वर्षांमध्ये वीस हजार टक्क्याहून अधिकचा परतावा दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 2 मार्च 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 11 पैशांवर होते, मात्र आज 5 फेब्रुवारी 2025 रोजी हा स्टॉक 23 रुपयांवर पोहोचलाय. दरम्यान, गेल्या 4 वर्षात पेनी शेअरमध्ये 16,000 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

४ फेब्रुवारी २०२१ रोजी कंपनीचा शेअर १४ पैशांवर होता. तसेच गेल्या वर्षभरात १६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. 5 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीचा शेअर 8.79 रुपयांवर होता.

गेल्या 6 महिन्यांत या शेअर्समध्ये 75 टक्क्यांची वाढ झाली आहे. 5 ऑगस्ट 2024 रोजी कंपनीचा शेअर 13.24 रुपयांवर होता. दरम्यान या कंपनीचे मार्केट कॅप १६३ कोटींच्या पुढे गेले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe