Penny Stocks : शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे अपडेट आहे. विशेषता जे लोक पेनी स्टॉक वर नजर ठेवून असतात अशांसाठी हे अपडेट खास राहणार आहे. अनेक गुंतवणूकदार शेअर मार्केट मधील पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक करतात. म्हणून अशा स्टॉककडे म्हणजे समभागांकडे गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असते.
दरम्यान, 7 फेब्रुवारी 2025 रोजी म्हणजेच आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात काही पेनी शेअर्सला मोठी मागणी आली होती. यात सुपीरियर फिनलीज कंपनीच्या पेनी स्टॉकचा सुद्धा समावेश होता.
![Penny Stocks](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2025/02/Penny-Stocks.jpeg)
आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी हा शेअर मोठ्या प्रमाणात फोकस मध्ये राहिला. फक्त एक रुपये किंमत असणारा हा स्टॉक गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय राहिला. हा स्टॉक खरेदीसाठी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यामुळे या स्टॉकच्या किमती शुक्रवारी 12 टक्क्यांनी वाढल्यात. शुक्रवारच्या दिवशी या स्टॉकची प्रेविअस क्लोजिंग प्राईस 1.56 रुपये इतकी होती मात्र शुक्रवारी हा शहर 12 टक्क्यांनी वाढवून 1.80 वर पोहोचला.
विशेष बाब अशी की हा स्टॉक शुक्रवारी 1.74 रुपयांच्या किमतीवर क्लोज झाला म्हणजेच हा स्टॉक 11.54 टक्क्यांच्या वाढीसह क्लोज झाला. आता आपण हा स्टॉक नेमका तेजीत का येतोय? याचे कारण शोधण्याचा छोटासा प्रयत्न करणार आहोत.
स्टॉक तेजीत येण्याचे कारण
सुपीरियर फिनलीज कंपनीचा स्टॉक शुक्रवारी 11.54 टक्क्यांनी वाढला, सध्या हा स्टॉक 1.74 रुपयांच्या किमतीवर पोहचलाय. खरेतर या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक 2.05 रुपये आहे अन 52 आठवड्यांचा नीचांक 1.12 रुपये आहे. एकंदरीत हा स्टॉक आपल्या नीचांकी पातळीपेक्षा आता बऱ्यापैकी सुधारला आहे.
एकाच दिवसात या स्टॉकच्या किमती जवळपास 12 टक्क्यांनी वाढल्या आहेत. खरंतर या कंपनीचा स्टॉक फोकस मध्ये येण्याचे कारण आणि स्टॉक खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी होण्याचे कारण म्हणजे या कंपनीने अलीकडेचं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ला एक महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.
कंपनीने एक्सचेंजला सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक 11/02/2025 रोजी होणार आहे. कंपनीने सांगितले की, तुम्हाला कळविण्यात येते की कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार, 11 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2:30 वाजता होणार आहे.
कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात होणाऱ्या या बैठकीत इतर गोष्टींबरोबरच 31 डिसेंबर 2024 रोजी संपणाऱ्या तिमाहीचे निकाल मंजूर केले जातील अशी अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. हेच कारण आहे की हा स्टॉक आता फोकस मध्ये आला असून गुंतवणूकदारांनी या स्टॉक वर उड्या टाकल्या आहेत.
म्हणून आता या कंपनीच्या तिमाही निकालातुन नेमकं काय समोर येतं ? निकाल लागल्यानंतरही गुंतवणूकदारांमध्ये हा स्टॉक असाच फोकस मध्ये राहतो का हे पाहण्यासारखे ठरणार आहे.