10 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या ‘या’ पेनी स्टॉक ने गुंतवणूकदारांना बनवले मालामाल !

Published on -

Penny Stocks : शेअर बाजारात सध्या अस्थिरता दिसून येत असली, तरी स्प्राइट अ‍ॅग्रोहिट (Sprite Agrohit) या पेनी स्टॉकने जबरदस्त प्रदर्शन करत गुंतवणूकदारांचे लक्ष वेधले आहे. सलग तीन दिवस 5% अपर सर्किट मारत हा शेअर 13 फेब्रुवारीला ₹8.11 वर बंद झाला.

11 फेब्रुवारीपासून या शेअरने जबरदस्त वाढ घेतली असून केवळ तीन सत्रांत 15% पेक्षा जास्त उसळी घेतली आहे. आता आपण या Sprite Agrohit कंपनीची शेअर बाजारातील सध्याची स्थिती, या स्टॉकचा सध्याचा ट्रेंड, स्टॉकच्या किंमती वाढण्याचे कारण या मुद्द्यांची तपशीलवार माहिती पाहणार आहोत.

शेअर प्राइसचा ट्रेंड कसा आहे ?

मागील एक वर्षात शेअर 12% पेक्षा जास्त वाढला आहे.
जानेवारी 2025 मध्ये तब्बल 56% घसरणीनंतर, फेब्रुवारीत आतापर्यंत 15% च्या वाढीची नोंद.
सध्या शेअर ऑगस्ट 2024 मध्ये नोंदवलेल्या ₹44.66 च्या 52 आठवड्यांच्या उच्चांकापेक्षा 82% खाली आहे.
मात्र ऑक्टोबर 2024 मध्ये 5.33 च्या निचांकी पातळीवरून 52% ची उसळी घेतली आहे.

शेअर वाढीमागचे कारण काय ?

स्प्राइट अ‍ॅग्रोहिट कंपनीने 11 फेब्रुवारीला काही अफवांवर स्पष्टीकरण देत गुंतवणूकदारांचा विश्वास पुनर्स्थापित करण्याचा प्रयत्न केला. कंपनीने सांगितले की, त्यांच्यावर सट्टेबाजी आणि इनसाइडर ट्रेडिंगमध्ये सहभागी असल्याचे खोटे आरोप लावले जात आहेत.

हे आरोप पूर्णतः निराधार असून कंपनी लॉन्ग-टर्म ग्रोथ आणि पारदर्शकतेसाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कंपनीने जाहीर केले की, स्प्राइट अ‍ॅग्रो कोणत्याही सट्टेबाजी किंवा इनसाइडर ट्रेडिंगमध्ये सहभागी नाही. अफवांमुळे आमच्या प्रतिमेवर परिणाम होत असून आम्ही तिचे रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करत आहोत.

कंपनीच्या आर्थिक कामगिरीत मोठी सुधारणा

स्प्राइट अ‍ॅग्रोहिटच्या डिसेंबर 2024 तिमाहीच्या निकालांनुसार, कंपनीने उल्लेखनीय वाढ नोंदवली आहे. डिसेंबर 2024 मध्ये कंपनीच उत्पन्न 5,499.27 लाख आहे जे मागील वर्षीच्या 2,267.15 लाखांपेक्षा 142.56% अधिक आहे. त्याच कालावधीत नेट प्रॉफिट 28.9% वाढून 708.88 लाखांवर पोहोचला आहे.

नऊ महिन्यांच्या कालावधीत उत्पन्न 464.4% वाढून 16,204.60 लाखांवर पोहोचले आहे जे आर्थिक वर्ष 2023-24 च्या संपूर्ण उत्पन्नाच्या दुपटीपेक्षा जास्त आहे. खरेतर, स्प्राइट अ‍ॅग्रोहिटच्या शेअरने नुकत्याच दिलेल्या स्पष्टीकरणानंतर सातत्याने वाढ दर्शवली आहे. भविष्यात हा शेअर गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी ठरू शकतो. मात्र, गुंतवणुकीपूर्वी योग्य संशोधन करून निर्णय घेणे आवश्यक आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe