वाईट काळ संपला ! 9 जून 2025 पासून ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, नवग्रहातील ग्रह एका ठराविक कालावधीनंतर राशी आणि नक्षत्र परिवर्तन करत असतो. सोबतच ग्रहांचा अस्त आणि उदय सुद्धा होतो. दरम्यान , जेव्हा ग्रहांचे राशी परिवर्तन होते तेव्हा काही शुभ आणि अशुभ योगाची सुद्धा निर्मिती होते.

Published on -

Zodiac Sign : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, शनि हा ग्रह सर्वात संथ गतीने भ्रमण करणारा ग्रह आहे. दरम्यान शनी ग्रहाने नुकत्याच काही महिन्यांपूर्वी राशी परिवर्तन केले आहे. शनी ग्रहाने मीन राशित प्रवेश केला असून आता हा ग्रह जवळपास 2027 पर्यंत याच राशीत राहणार आहे.

शनी ग्रह एका राशीत अडीच वर्ष राहतो यामुळे 2027 पर्यंत शनी ग्रह मीन राशी मध्ये विराजित राहणार असून या काळात शनी ग्रहाची वेगवेगळ्या ग्रहांसोबत युती होणार आहे. त्यामुळे काही नव्या योगाची निर्मिती सुद्धा होईल. यातील काही योग राशीचक्रातील काही लोकांसाठी फायदेशीर ठरतील तर काही लोकांसाठी हे योग नुकसानकारक ठरू शकतात.

दरम्यान ज्योतिष तर यांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या चार दिवसांनी म्हणजेच 9 जून 2025 रोजी ग्रहांचा राजकुमार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुध ग्रहाची आणि शनी ग्रहाची युती होणार आहे. बुध आणि शनी ग्रह 9 जून रोजी सायंकाळी सव्वाचार वाजेच्या सुमारास 90 अंशाचा कोन तयार करणार आहे.

यामुळे केंद्रयोग तयार होणार असून या योगाचा प्रभाव राशी चक्रातील काही राशीच्या लोकांवर पाहायला मिळेल. या योगामुळे काही राशीच्या लोकांना चांगला लाभ मिळणार आहे तर काही लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. दरम्यान आता आपण या योगाचा राशीचक्रातील कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार याचा आढावा घेणार आहोत.

 या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश

मकर : मकर राशीच्या लोकांचा वाईट काळ आता समाप्त होणार आहे. नऊ जून पासून या राशीच्या लोकांना सुखाचे दिवस अनुभवायला मिळतील. बुध आणि शनि देवाच्या कृपेने या राशीच्या लोकांसाठी हा काळ आर्थिक उन्नती, करिअरमध्ये प्रगती आणि वैयक्तिक जीवनात आनंद घेऊन येणार आहे.

या काळात विद्यार्थ्यांना सुद्धा चांगले यश मिळणार आहे. जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी तयारी करत आहेत त्यांना या काळात सक्सेस मिळू शकते. तसेच जे लोक अविवाहित आहेत त्यांना विवाहाचे प्रस्ताव सुद्धा येण्याची शक्यता आहे.

कुंभ : मकर राशीच्या लोकांप्रमाणेच कुंभ राशीच्या लोकांसाठी देखील बुध आणि शनी ग्रहाच्या कृपेने अच्छे दिन येणार आहेत. नऊ जून पासून या राशीच्या लोकांचाही वाईट काळ आता संपणार आहे. हा योग दीर्घकालीन समस्यांचे निरसन, परदेशात व बहुराष्ट्रीय कंपन्यांतील कामात यश, आणि मालमत्तेत लाभ देणारा ठरणार अशी माहिती ज्योतिषतज्ञाकडून दिली जात आहे. या लोकांना मानसिक शांती आणि कुटुंबात सौख्य याचा अनुभव येईल.

वृषभ : या राशीच्या लोकांना सुद्धा मकर आणि कुंभ राशीच्या लोकांप्रमाणेच आयुष्यात अनेक गोष्टी साध्य करता येणार आहेत. नऊ जून 2025 पासून या राशीच्या लोकांचाही वाईट काळ समाप्त होईल. बुध आणि शनी ग्रहाच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या करिअरमध्ये एक सकारात्मक बदल आपल्याला पाहायला मिळेल.

करिअरवाईज हा काळ फारच बेस्ट राहणार असे म्हटले जात आहे. करिअर अन व्यवसायात सुद्धा या काळात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. या काळात नोकरीत पदोन्नती आणि आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हा काळ फारच अनुकूल राहण्याची शक्यता आहे. पालकांची आपल्या मुलांबाबत असणारी चिंता या काळात कमी होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News