महिन्याचा पगार 50 हजार रुपये असेल तर बँकेकडून तुम्हाला किती पर्सनल लोन मिळणार ? बँकेचे नियम काय सांगतात ?

आपण Personal Loan घेण्याच्या तयारीत आहात का? मग आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. तुमच्या पगारानुसार बँकेकडून तुम्हाला जास्तीत जास्त किती पर्सनल लोन मंजूर होऊ शकतं याबाबत आज आपण माहिती पाहणार आहोत. जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे, 50 हजार पगार असणाऱ्या लोकांना बँकेकडून जास्तीत जास्त 12 ते 13 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होऊ शकते.

Published on -

Personal Loan News : आपल्याला पैशांची गरज भासली की आपण बँकेचे दरवाजे ठोठावत असतो. पैशांची एमर्जेंसी अडचण असेल तर अनेक जण पर्सनल लोन अर्थात वैयक्तिक कर्ज घेतात. मात्र वैयक्तिक कर्जाचे व्याजदर हे इतर कर्जांच्या तुलनेत थोडीसे अधिक असतात. कारण वैयक्तिक कर्ज हे असुरक्षित प्रकारातील कर्ज म्हणून ओळखले जाते.

दरम्यान, जर तुम्हीही नजीकच्या भविष्यात वैयक्तिक कर्ज घेण्याच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी फारच कामाची ठरणार आहे. आज आपण पन्नास हजार रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला किती रुपयांचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते याबाबतचा थोडक्यात आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

50 हजार पगार असणाऱ्या ला किती वैयक्तिक कर्ज मिळणार?

पगारदारांना जर पैशांची गरज भासली की ते थेट बँकेत जातात आणि एमर्जेंसी सिच्युएशन मध्ये बँकेतून पर्सनल लोन घेतात. कारण असे की बँक ताबडतोब पर्सनल लोन मंजूर करतात. यासाठी बँकांचे व्याजदर हे निश्चितच इतर कर्जांच्या तुलनेत अधिक असते मात्र बँकेकडून पर्सनल लोन जलद गतीने मंजूर होते आणि यामुळे अनेकजण बँकेकडून पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असतात.

खरंतर पर्सनल लोन साठी बँकेकडून कोणतीच गोष्ट गहाण म्हणून ठेवली जात नाही. म्हणजेच विनातारण प्रश्न लोन उपलब्ध होते. म्हणून साहजिकच पर्सनल लोन हे कोणत्या आधारावर ग्राहकांना दिले जाते हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.

तर आम्ही आपणास सांगू इच्छितो की बँका वैयक्तिक कर्ज हे व्यक्तीच्या पगाराच्या आधारावरच देत असतात. तुम्हाला किती पगार आहे यावरूनच तुमच्या उत्पन्नाची आणि आर्थिक परिस्थितीची बाजू बँक समजून घेते आणि तुम्हाला कर्ज मंजूर करत असते.

अशा परिस्थितीत आता आपण तुमच्या पगारानुसार बँकेकडून तुम्हाला जास्तीत जास्त किती वैयक्तिक कर्ज मंजूर होऊ शकतं याबाबत माहिती पाहूयात. मिळालेल्या माहितीनुसार ज्या लोकांचा महिन्याचा पगार हा 50 हजार रुपये आहे अशा लोकांना बँकेकडून 13 लाख रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

मात्र यासाठी तुमच्यावर आधीपासूनच कर्ज नसावे ही मोठी अट राहणार आहे. म्हणजे ज्या लोकांच्या डोक्यावर आधीच कोणत्याही प्रकारचे कर्ज नाही अशा लोकांना महिन्याचा पगार 50 हजार असल्यास जास्तीत जास्त तेरा लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज मिळू शकते.

दुसरीकडे, ज्या लोकांचा मासिक पगार 70 हजार रुपये आहे अशा लोकांना बँकेकडून 18 लाख रुपयांचे कमाल वैयक्तिक कर्ज उपलब्ध करून दिले जाते. मात्र यासाठी तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे आवश्यक आहे. सिबिल स्कोर 800 च्या आसपास असल्यास बँकेकडून जास्तीत जास्त वैयक्तिक कर्ज मंजूर होऊ शकते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe