तुम्ही खुर्चीवर कसे बसता ? खुर्चीवर बसण्याच्या सवयीवरून सुद्धा व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व ओळखता येतो !

असं म्हणतात की व्यक्तीच्या खुर्चीवर बसण्याचा सवयीवरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवता येणे शक्य आहे. दरम्यान, आज आपण व्यक्तीच्या खुर्चीवर बसण्याच्या सवयीवरून त्याचा स्वभाव अन व्यक्तिमत्व कस असेल याची माहिती पाहणार आहोत.

Personality Test

Personality Test : आपल्या आजूबाजूला असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव आणि शारीरिक जडणघडण वेगवेगळी असते. आपण व्यक्तीच्या वागण्यावरून त्याचा स्वभाव कसा आहे ? याचा अंदाज बांधता येतो. पण फक्त एकदा-दोनदा एखाद्याला भेटलो तर त्याचा खरा स्वभाव आपल्याला समजूच शकेल असं नाही.

पण व्यक्तीच्या शारीरिक जडणघडण वरून त्याच्या स्वभावाची आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवता येते. आपण खुर्चीवर कसे बसतो यावरूनही आपला स्वभाव समजु शकतो.

असं म्हणतात की व्यक्तीच्या खुर्चीवर बसण्याचा सवयीवरून त्या व्यक्तीच्या स्वभावाचे आणि व्यक्तिमत्त्वाची ओळख पटवता येणे शक्य आहे. दरम्यान, आज आपण व्यक्तीच्या खुर्चीवर बसण्याच्या सवयीवरून त्याचा स्वभाव अन व्यक्तिमत्व कस असेल याची माहिती पाहणार आहोत.

पाय सरळ ठेऊन बसणारे : जे लोक खुर्चीवर गुडघे सरळ ठेवून म्हणजेच पाय सरळ ठेऊन बसतात ते बुद्धिमान, तार्किक विचार करणारे आणि वक्तशीर मानले जातात. असे लोक स्वतःवर विश्वास ठेवतात. त्यांच्यात आत्मविश्वास असतो.

दोन पायात अंतर ठेऊन बसणारे लोक : या स्थितीत जे लोक खुर्चीवर बसतात ते खूपच गर्विष्ठ, क्षुद्र, निर्णयक्षम, कमी लक्ष देणारे आणि सहज कंटाळवाणे असतात. काही लोक खुर्चीवर बसताना दोन पायात अंतर ठेवतात, तुमच्याही या आजूबाजूला असे लोक असतील. असं म्हणतात की, अशा लोकांचे मन खूप गोंधळलेले असते.

पायावर पाय ठेवून बसणारे लोक : काही लोक खुर्चीवर बसताना पायावर पाय ठेवून बसतात असे म्हणतात की असे लोक सर्जनशील, नम्र आणि लाजाळू स्वभावाचे असतात. हे लोक मोकळेपणाने जीवनाचा आनंद घेतात. पण असे लोक कधीच असे काम करत नाहीत जे करणे त्यांना योग्य वाटत नाही.

पायाचा खालील भाग क्रॉस करून बसणे : काही लोक खुर्चीवर बसताना पायाचा खालील भाग क्रॉस करून बसतात. असं म्हणतात की, ही ब्रिटिश राजघराण्याची बसण्याची स्थिती आहे. यामुळे अशा लोकांमध्ये राजेशाही घराण्याची वृत्ती असते असे म्हटले जाते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe