Petrol And Diesel Price Decrease : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाली आहे. महिन्याकाठी येणारा पगार तसेच व्यवसायातून येणारे पैसे घर खर्चातच संपत आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या सेव्हिंग्स मोठ्या प्रमाणात घटत चालल्या आहेत. जेवढा पैसा कमावला जातोय तेवढाच पैसा खर्च सुद्धा होतोय. अशातच जर आजरपण आले किंवा इतर काही अडचण आली तर अशावेळी सर्वसामान्यांना कर्जाशिवाय दुसरा पर्याय राहत नाही.
अशा या संकटाच्या काळातच मात्र सर्वसामान्यांसाठी एक गोड बातमी समोर आली आहे. ती म्हणजे येत्या काही दिवसांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळू शकते. यामुळे वाढत्या महागाईने बेजार झालेल्या सर्वसामान्यांना नक्कीच दिलासा मिळू शकणार आहे. पण इंधनाच्या किमती अचानक कमी का होतील ? याचे प्रमुख कारण काय आहे? याचाचं आज आपण आढावा घेणार आहोत.

इंधनाच्या किमती कमी होण्याचे प्रमुख कारण
कच्च्या तेलाच्या घसरलेल्या किमती : मंडळी जेव्हा रशिया आणि युक्रेन या उभय देशांमध्ये युद्ध सुरू झाले त्यावेळी कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 130 डॉलर्स पर्यंत पोहोचलेली होती. मात्र, काल अर्थातच 11 सप्टेंबर 2024, बुधवारी ब्रेंट क्रूडचे नोव्हेंबर फ्युचर्स प्रति बॅरल 69.58 डॉलर्सवर घसरले आहेत. डब्ल्यूटीआय क्रूड ऑक्टोबर फ्युचर्सची किंमतही प्रति बॅरल 66.18 डॉलर्स झाली आहे.
तज्ञ लोकांनी दिलेल्या माहितीनुसार 2021 नंतर प्रथमच म्हणजेच गेल्या तीन वर्षांमध्ये पहिल्यांदाच ब्रेंट फ्युचर्स (क्रूड) प्रति बॅरल 70 डॉलर्सच्या खाली आले आहेत. याचा अर्थ असा की रशिया युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमती जवळपास निम्म्याने कमी झाल्या आहेत. यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
विधानसभा निवडणुका ठरणार कारणीभूत : कच्च्या तेलाच्या किमती तर कमी झाल्याच आहेत शिवाय आगामी काळात महाराष्ट्राचे देशातील काही प्रमुख राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची भारतीय निवडणूक आयोगाने घोषणा देखील केली आहे. जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यात येत्या काही दिवसांनी विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
अशा परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी आणि आगामी विधानसभा निवडणुकीत मतदारांना आकर्षित करण्यासाठी केंद्रातील सरकार पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ शकते, सकारात्मक पावले उचलू शकते असे मत काही जाणकारांनी व्यक्त केले आहे.
सरकारी तेल कंपन्यांना झालाय प्रचंड नफा : सरकारी तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने कमी होत असल्याने इंधना मधून प्रचंड नफा कमवला आहे. 2024 च्या पहिल्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च 2024 या कालावधीत सरकारी तेल कंपन्यांनी जबरदस्त नफा गेन केला असून हे देखील कारण आगामी काळात इंधनाच्या किमती कमी करण्यासाठी कारणीभूत ठरेल असे म्हटले जात आहे.
किमती कधी कमी होणार ?
पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू आहेत. परंतु या किमती नेमक्या कधी कमी होतील हा मोठा यक्षप्रश्न आहे. अशातच मात्र जाणकारांनी ब्रेंटच्या किमतींचा आणखी काही आठवडे आढावा घेतल्यानंतर सरकारी ऑइल मार्केटिंग कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याचा निर्णय घेऊ शकतात असा दावा केला आहे. म्हणजे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होण्यासाठी आणखी काही आठवडे वाट पाहावी लागणार आहे.