……तर मुंबई आणि पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती दहा रुपयांपर्यंत स्वस्त होणार !

Published on -

Petrol And Diesel Price : गेल्या काही वर्षांपासून सर्वसामान्य जनता वाढत्या महागाईमुळे पूर्णपणे त्रस्त आहे. वाढत्या महागाईतून सर्वसामान्यांना दिलासा मिळायला हवा अशी मागणी आहे. मात्र सातत्याने महागाईचा दर वाढत आहे. सर्वच जीवन आवश्यक वस्तू महाग झाल्या आहेत आणि यामुळे सर्वसामान्यांना आपल्या संसारातील गरजा भागवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती देखील गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. अशातच मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी हाती येत आहे. ती म्हणजे लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी होऊ शकतात असा अंदाज समोर येऊ लागला आहे.

खरे तर अमेरिकन बँकेने नुकताच एका अंदाज वर्तवला आहे ज्यामध्ये 2025 च्या अखेरीस किंवा 2026 मध्ये कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊ शकतात असे म्हटले गेले आहे. दरम्यान जर अमेरिकन बँकेचा हा अंदाज खरा ठरला तर याचा परिणाम हा देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीवर देखील पाहायला मिळणार आहे.

खरेतर, सध्या आखाती देशांमध्ये कच्च्या तेलाची किंमत 71 डॉलरवर आली आहे. दुसरीकडे, अमेरिकन कच्च्या तेलाचे दर सुद्धा कमी झाले असल्याची नोंद करण्यात आली असून सध्या हे दर प्रति बॅरल 67 डॉलरवर आहेत.

एकंदरीत चालू वर्षात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्या असल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुद्धा घसरण होणे अपेक्षित आहे. पण मात्र गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलाच्या किमती सातत्याने कमी होत असताना देखील पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झालेल्या नाहीत.

देशातील अनेक राज्यांमध्ये आजही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती शंभर रुपयांच्या आसपास आहेत. पेट्रोलच्या किमती शंभर रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत असून त्यामुळे सरकारच्या विरोधात देखील मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. सध्या राष्ट्रीय राजधानी दिल्ली वगळता कोलकाता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 100 रुपये प्रति लिटर आहे.

हे दर कच्च्या तेलाच्या किमतीशी तुलना केली असता खूप जास्त आहेत. पण देशातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असे दिसते. भारतीय कमोडिटी तज्ञांनी येत्या काही महिन्यांनी देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता वर्तवली आहे.

तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे या चालू वर्षात कच्च्या तेलाच्या किमती याच पातळीवर राहण्याची शक्यता आहे. यामुळे जर तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरला तर 2026 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत जवळपास दहा रुपयांपर्यंतची कपात होण्याची शक्यता आहे.

म्हणजेच देशाची राजधानी मुंबईत पेट्रोलचा दर 84 ते 85 रुपये आणि डिझेलचा दर 77 ते 78 रुपये प्रति लिटरवर येऊ शकतो. नक्कीच पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत जर दहा रुपयांपर्यंतची घसरण झाली तर सर्वसामान्यांना याचा मोठा फायदा होणार असून असे झाल्यास देशातील महागाईचे आकडे आणखी कमी होतील.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe