पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत मोठी वाढ ! मुंबई, पुणे, अहिल्यानगर, नाशिकसह महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील रेट जाणून घ्या

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत आहे आणि आज आपण 23 जून 2025 रोजी पेट्रोल आणि डिझेलचे रेट कसे आहेत ? याचा आढावा घेणार आहोत.

Published on -

Petrol And Diesel Rate : सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ मोठ्या घडामोडी घडत असतात. जगातील अनेक देशांमध्ये अगदीच तणावाची परिस्थिती तयार झाली आहे. रशिया आणि युक्रेन या दोन देशांमध्ये उद्योग सुरू असतानाचा आता इजराइल आणि इराण मध्ये देखील युद्धाचा भडका उडाला आहे.

दरम्यान इराण आणि इजराइल या दोन देशांमध्ये सुरू झालेल्या याच तणावाच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत इंधन दरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण असे की इराणने अलीकडेच होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यामुळे जगभरातील तेलाच्या किमती गगनाला भिडू शकतात.

होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत मंजूर झाला आहे. आता याबाबतचा अंतिम निर्णय इराणी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी घेणार असे सांगितले गेले आहे. परिणामी, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

यामुळे आधीच महागाईच्या झळा सोसत असलेल्या सामान्य जनतेला आणखी एका मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. दरम्यान आता आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे रेट कसे आहेत याचा आढावा घेणार आहोत. 

पेट्रोल आणि डिझेलचे रेट कसे आहेत?

खरेतर, पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी सहा वाजता अपडेट केले जातात. आज 23 जून 2025 रोजी राज्यातील विविध शहरांतील इंधन दर जाहीर करण्यात आले असून, अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 105 रुपयांच्या वर गेले आहेत.

डिझेलचे दरही 92 रुपये प्रति लिटरच्या जवळपास पोहोचलेले आहेत. अहिल्यानगरमध्ये पेट्रोलचे रेट 104.30 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे रेट 90.83 रुपये प्रति लिटर इतके आहेत.

मुंबईत पेट्रोलचे रेट 103.50 आणि डिझेलचे रेट 90.03 रुपये इतके आहेत. पुण्यात पेट्रोलचे रेट 104.57 रुपये आणि डिझेलचे रेट 91.08 रुपये आहेत. ठाण्यात पेट्रोलचे रेट 103.80 रुपये आणि डिझेलचे रेट 90.31 रुपये आहेत.

नाशिकमध्ये पेट्रोलचे रेट 104.22 आणि डिझेलचे रेट 90.75 रुपये इतके आहेत. छत्रपती संभाजी नगर मध्ये पेट्रोलचे रेट 104.73 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे रेट 91.24 प्रति लिटर इतके आहेत. नांदेड शहरात पेट्रोलचे रेट 105.49 आणि डिझेलचे रेट 92.02 रुपये इतके आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!