PF News : देशातील खाजगी तसेच सरकारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवाकाळादरम्यान तसेच सेवानिवृत्तीनंतर काही महत्त्वाचे लाभ मंजूर केले जातात. दरम्यान, जर तुम्हीही खाजगी क्षेत्रात कार्यरत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची ठरणार आहे.
खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि PF कट होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी विशेष खास आहे. कारण की खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांसाठी केंद्रातील सरकारकडून लवकरच एक दिलासादायक निर्णय घेतला जाणार असल्याची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत (EPS) किमान पेन्शन लवकरच वाढवण्याची शक्यता आहे. सरकार किमान पेन्शन 1 हजार रुपयांवरून 3 हजार रुपये करण्याचा विचार करत असल्याचा दावा केला जात आहे.
महत्वाचे म्हणजे याबाबत सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही वाढ लवकरच लागू होण्याची सध्या शक्यता आहे. मीडिया रिपोर्टवर जर विश्वास ठेवला तर पुढील काही महिन्यात ही वाढ लागू होऊ शकते. या वर्षातच किमान पेन्शनची रक्कम वाढवण्याची शक्यता आहे. साहजिकच या निर्णयानंतर देशातील लाखो कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
काय आहेत डिटेल्स
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या कर्मचाऱ्याच्या मूळ पगारातुन ठराविक रक्कम पीएफमध्ये जाते आणि तेवढीच रक्कम नियोक्त्याकडून म्हणजेच कंपनीकडून सुद्धा जमा होते. सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारातून 12% रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जात आहे.
महत्त्वाची बाब म्हणजे ईपीएफओ कडे जमा होणाऱ्या या रकमेतील 8.33% रक्कम कर्मचारी पेन्शन योजनेत (EPS) जाते. दरम्यान याच जमा रकमेतून निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळत असते. सध्या कर्मचाऱ्यांना 1000 रुपये एवढी किमान पेन्शन लागू आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की 2014 मध्ये सरकारने किमान पेन्शन 250 रुपयांवरून एक हजार रुपये एवढी केली होती. मात्र त्यानंतर यामध्ये कोणताच बदल झालेला नाही. आजही किमान पेन्शन 1000 रुपये एवढीच आहे.
खरेतर 2020 मध्ये EPS अंतर्गत किमान पेन्शन दुपटीने वाढवण्याचा विचार करण्यात आला होता आणि याबाबतचा प्रस्ताव सुद्धा सरकारकडे वर्ग करण्यात आला होता. मात्र तो प्रस्ताव काही कारणास्तव सरकारकडून मंजूर झाला नाही.
आता मात्र किमान पेन्शन मध्ये तीन पट वाढ होण्याची शक्यता आहे म्हणजेच किमान पेन्शन 3000 रुपयांपर्यंत वाढवली जाऊ शकते. दुसरीकडे एका संसदीय समितीने तसेच विविध कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांची किमान पेन्शन साडेसात हजार रुपयांपर्यंत झाली पाहिजे अशी मागणी केलेली आहे.
कारण की महागाईचा दर प्रचंड वाढला आहे. यामुळे पेन्शन धारकांची पेन्शन देखील मोठ्या प्रमाणात वाढणे आवश्यक आहे. यामुळे आता किमान पेन्शन तीन हजार रुपये करण्याचा निर्णय होतो की थेट साडेसात हजार रुपयांपर्यंत वाढवली जाते हे पाहणे विशेष उत्सुकतेचे ठरणार आहे.