आनंदाची बातमी ! ‘या’ जिल्ह्यातील पीएम आवास योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार 15000 चा पहिला हप्ता, कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी?

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पीएम आवास योजनेच्या पहिल्या हप्त्याची वाट पाहिली जात होती ती आतुरता आता दूर होईल हे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दहा हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर हा पहिला हप्ता जमा होणार आहे.

Tejas B Shelar
Published:
Pm Awas Yojana

Pm Awas Yojana : 2014 मध्ये सत्तेत आलेल्या मोदी सरकारने सत्ता स्थापित केल्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी शेकडो योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये पीएम आवास योजनेचा देखील समावेश होतो. पीएम आवास योजना दोन भागात विभागली गेली आहे. पीएम आवास योजना शहरी आणि पीएम आवास योजना ग्रामीण असे या योजनेचे दोन प्रकार आहेत.

दरम्यान याच योजनेसंदर्भात आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पीएम आवास योजनेच्या जवळपास दहा लाख लाभार्थ्यांना या योजनेचा पहिला हप्ता येत्या पंधरा तारखेला दिला जाणार आहे.

15 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची बातमी समोर आली आहे. दहा लाख घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 15 हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा होणार आहे.

त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पीएम आवास योजनेच्या पहिल्या हप्त्याची वाट पाहिली जात होती ती आतुरता आता दूर होईल हे स्पष्ट झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील दहा हजार लाभार्थ्यांच्या खात्यावर हा पहिला हप्ता जमा होणार आहे.

यामुळे जिल्ह्यातील हजारो नागरिकांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. खरे तर देशभरातील बेघर लोकांना हक्काचे घर उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

सर्वांना घर या घोषणेनुसार आता पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 सप्टेंबर 2024 ला पीएम आवास योजनेच्या दहा लाख घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता केवळ एका क्लिकने जमा करणार आहेत.

पीएम आवास योजने अंतर्गत किती अनुदान मिळते

पीएम आवास योजनेअंतर्गत घरकुल बांधणीसाठी मैदानी भागातील नागरिकांना एक लाख वीस हजार आणि डोंगराळ भागातील नागरिकांना एक लाख तीस हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. याशिवाय, स्वच्छ भारत मिशनकडून शौचालयासाठी १२ हजारांचे अनुदान आणि ‘नरेगा’अंतर्गत १८ ते २० हजार रुपयांची मजुरी दिली जाते.

संभाजीनगरमध्ये कोणत्या तालुक्यात किती लाभार्थी

छत्रपती संभाजीनगर – १८०३, गंगापूर- ४२८६, कन्नड- ३२८९, खुलताबाद- १०८१, पैठण- ३४७७, फुलंब्री- १३९६, सिल्लोड- ४०३६, सोयगाव- १६८२, वैजापूर- ३९५९

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe