PM Awas Yojana : पीएम आवास योजनेसाठी अर्ज केलेल्या अर्जदारांकरिता एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. पीएम आवास योजना ही केंद्रातील सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना. ही योजना दोन भागात विभागण्यात आली आहे. पीएम आवास योजना ग्रामीण आणि पीएम आवास शहरी असे या योजनेचे दोन प्रकार आहेत.
दरम्यान पीएम आवास योजना ग्रामीण संदर्भात नुकतेच एक महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे ती म्हणजे या योजनेच्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही योजना 2016 मध्ये ग्रामीण विकास मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे.

ग्रामीण भागातील आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नागरिकांसाठी या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून या अंतर्गत बेघर लोकांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले जात आहे. पीएम आवास योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना सरकारकडून अनुदान स्वरूपात मदत दिली जाते.
आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून देशभरातील तीन कोटी लाभार्थ्यांना हक्काचे घर उपलब्ध झाले आहे. दरम्यान आता आपण पीएम आवास योजना ग्रामीणची लाभार्थी यादी कशी तपासायची याबाबतची माहिती पाहणार आहोत.
योजनेतून किती अनुदान मिळते?
पीएम आवास योजना ग्रामीण च्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना 1.30 लाख रुपयांपर्यंत अनुदान मिळते. मैदानी क्षेत्रातील लाभार्थ्यांना या योजनेतून 1.20 लाख रुपये आणि दुर्गम क्षेत्रातील लाभार्थ्यांना या योजनेतून 1.30 लाख रुपये इतके अनुदान देण्याची तरतूद आहे.
यासाठी सरकारकडून आवास ॲप हे नवीन एप्लीकेशन लॉन्च करण्यात आले आहे. या ॲपद्वारे लाभार्थी त्यांच्या घराच्या बांधकामाची सद्यस्थिती सुद्धा पाहू शकतात. बांधकाम स्थळाचे जिओ-टॅगिंग सुद्धा एप्लीकेशनच्या माध्यमातून करता येते. या ठिकाणी लाभार्थ्यांना तक्रारी दाखल करता येतात.
दरम्यान आता पीएम आवास योजना ग्रामीणची लाभार्थी यादी प्रकाशित झाली आहे. या यादीनंतर लवकरच दुसरी पण यादी जाहीर केली जाणार अशी शक्यता आहे. यामुळे ज्या लाभार्थ्यांचे पहिल्या यादीत नाव नसेल त्यांचे नाव दुसऱ्या यादीत येऊ शकते.
लाभार्थी यादीत नाव कसे शोधायचे ?
तुम्ही पीएम आवास योजना ग्रामीण साठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला लाभार्थी यादीत तुमचे नाव शोधायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे. pmayg.nic.in ही योजनेची अधिकृत वेबसाईट आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ‘Stakeholders’ विभागात क्लिक करायचे आहे. पुढे ‘IAY/PMAYG Beneficiary’ किंवा ‘Search Beneficiary’ पर्याय निवडायचा आहे. जर तुमच्याकडे नोंदणी क्रमांक नसेल तर अशावेळी ‘Advanced Search’ वर क्लिक करावे लागेल.
मग राज्य, जिल्हा, गट (ब्लॉक) आणि गाव निवडून कॅप्चा (Captcha) भरायचा आहे व ‘Submit’ बटन क्लिक करावे लागेल. यानंतर तुमच्या गावांतील सर्व लाभार्थ्यांची यादी तुम्हाला पाहता येणे शक्य होईल. या यादीत तुम्ही तुमच नाव शोधू शकता. या यादीत मंजुरीची स्थिती आणि हप्त्यांसंबंधित माहिती सुद्धा दिलेली असते.













