Pm Kisan Yojana : केंद्रातील सरकारने 2019 साली एक महत्वपूर्ण निर्णय घेतला. मोदी सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या अंतर्गत पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातोय.
दोन हजार रुपयांचा एक हप्ता या पद्धतीने या पैशांचे वितरण केले जात आहे. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांना एकूण 21 हप्ते वितरित करण्यात आले आहेत आणि या नव्या वर्षात पुढील 22 वा हप्ता वितरित होणार आहे.

पण पुढील हफ्त्याचा लाभ हवा असल्यास लाभार्थ्यांना एक नवीन कागदपत्र सादर करावा लागणार आहे. अशा स्थितीत आता आपण पुढील 22 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना कधी मिळणार आणि या त्याच्या लाभासाठी शेतकऱ्यांना कोणते कागदपत्रे द्यावे लागणार? याची माहिती या लेखातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कधी मिळणार 22 वा हप्ता?
नव्या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार फेब्रुवारी महिन्यात केंद्रातील सरकारकडून केंद्रीय विधिमंडळात अर्थसंकल्प मांडला जाईल.
एक फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रातील सरकार अर्थसंकल्प मांडणार आहे आणि हा अर्थसंकल्प सादर झाला की त्यानंतर लगेचच पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता वितरित होण्याची शक्यता आहे.
म्हणजेच फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार असा दावा मीडिया रिपोर्ट मध्ये होतोय. पण पुढील योजनेचा लाभ हवा असल्यास शेतकऱ्यांना काही गोष्टींची पूर्तता मात्र करावी लागणार आहे.
फार्मर आयडी केले बंधनकारक
मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसानचा 22 वा हप्ता हवा असल्यास शेतकऱ्यांना आता एक नव आयडी कार्ड द्याव लागणार आहे. शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या लाभासाठी आता फार्मर आयडी बंधनकारक करण्याचा एक महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे.
केंद्रातील मोदी सरकारने पीएम किसानच्या नियमावलीत मोठी सुधारणा केली असून आत्ता प्रत्येक लाभार्थ्याला युनिक फार्मर आयडी अनिवार्य करण्यात आला आहे.
जे लाभार्थी शेतकरी वेळेत हे युनिक फार्मर आयडी तयार करणार नाहीत आणि पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन ते सादर करणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांचा पुढील हप्ता रोखला जाऊ शकतो. युनिक फार्मर आयडी ही शेतकऱ्यांची एक डिजिटल ओळख राहणार आहे जी की केंद्र सरकारच्या ॲग्रीस्टॅग या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा भाग आहे.